
पोलिस घटनास्थळी दाखल…आरोपी पसार…
देवरी,दि.17:- देवरीच्या पंचशील चौकात वास्तव्यास असलेल्या महिलेचे दागीने लुटून तिचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी ३ वाजेदरम्यान घडल्याचे उघडकीस आले आहे.
म्रूताचे नाव शशिकला साखरे (वय 35)राहणार पंचशील चौक देवरी असे आहे.
देवरी शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पंचशील चौकाच्या पलीकडे वास्तव्यास असलेल्या शशीकला साखरे या ३५ वर्षीय महिलेचा खुन करुन लुटपाटीचे प्रकरण घडल्याची घटना आज दुपारी ३.००वाजता सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर व देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी घटना स्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करून म्रुत महिलेचे शरीर शवविच्छेदना करिता देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणातील आरोपी अद्याप फरारी असून पोलिस त्याचा शोध किती लवकर घेतात, हे पाहणे एता महत्वाचे ठरणार आहे. सदर घटनेचा तपास अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.





