
गडचिरोली- जिल्ह्यातील गरजू शेतकर्यांकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्देशान जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दल, बीओआय स्टार आरसेटी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा ‘स्वयंरोजगार मेळावा’ व शेतकर्यांना स्प्रेअर पंप वाटप कार्यक्रम आज १८ ऑगस्ट रोजी पोलिस मुख्यालयाच्या एकलव्य धाम येथे पार पडला.
स्वयंरोजगार मेळाव्यास दुर्गम-अतिदुर्गम भागातील १00 प्रशिक्षणार्थी युवक-युवती व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मत्स्य व्यवसाय पूर्ण केलेल्या २७ प्रशिक्षणार्थिंना किलो मत्स्य बीज, ५ किलो मत्स्य खाद्य व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ३४ शेतकर्यांना प्रत्येक १ नग स्प्रेअर पंप वाटप करण्यात आले. तसेच बीओआय स्टार आरसेटी मार्फत घेण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर (शास्त्रज्ञ) डॉ. मल्लीकार्जुन, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली विषय विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, बीओआय स्टार आरसेटी गडचिरोलीचे संचालक चेतन वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धानोराचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्यासह धानोरांतर्गत असलेले सर्व पोस्ट/ उपपोस्टे/पोमकेचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदारांनी पर्शिम घेतले.





