Nandurbar: गढावली लघुपाट बंधारा 100 टक्‍के भरला

0
25

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प गढावली 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी सांडव्यातून अधिकचा विसर्ग चालू होऊन पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठावरील पाडळपूर, प्रतापपूर व गोपाळपूर या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.नंदुरबार, तळोदा तालुका परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाल्‍यांना पुर आला आहे. पुरामुळे तळोदा तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प गढावली शंभर टक्‍के फुल्‍ल भरला आहे. प्रकल्‍प ओव्‍हरफ्लो होण्याची शक्‍यता असून पाऊस  आणखी झाल्‍यास पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

नागरीकांना आवाहन

नदी व नाला काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे; असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा दमदार पावसामुळे मध्यम प्रकल्प लघुपाटबंधारे व नदी नाल्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.