आंतरराष्ट्रीय सायकलपटू सुशिकलाचा गौरव

0
18

 मोहाडी-तालुक्यातील निलज खुर्द या गावातील सुशिकला आगाशे या तरुणीने जिद्दीच्या बळावर सायकलिंग प्रकारात देशविदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पुरस्कार मिळविले आहेत. सुशिकलाने राष्ट्रकुल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव मोठे केले. इंग्लंडमधील बमिर्ंगहॅम येथे २0२२ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये टीम स्पिरीट या स्पर्धा प्रकारात सुशिकलाने सायकलिंग कौशल्याने जगात सहावे स्थान पटकावले. तिच्या यशाचा चढता आलेख पाहून ग्रामीण भागात अनेक खेळाडूंमध्ये यश खेचून आणण्याची जिद्द निर्माण झाली आहे.
सुशिकलाचे वडील घर बांधकाम मजूर आहेत. परंतु, सुशिकलामधील प्रबळ इच्छाशक्ती बघून तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहन दिले आहे. मागीलवर्षी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक व एक कांस्यपदक जिंकले. जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्ण व एक रजत पदक पटकाविले असून महाराष्ट्र सायकलिंग संघात कर्णधारपद भूषविले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या वतीने निलज खुर्द येथील आगाशे यांच्या निवासस्थानी सायकलपटू सुशिकलाला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेर्शाम, शाखा प्रमुख निखिल कटारे, दीपक मलेवार, पुष्पक त्रिभुवनकर, योगेश चिंधालोरे, स्वप्निल बडवाईक, रितेश शेंडे, निखिल कुंभलकर, आशिष मेर्शाम, राजेश बांते, क्रीडापटू सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.