Home राजकीय तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावी


देवरी,ता.१९ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांचे मार्फत विधानसभाध्यक्ष रमेश ताराम , तालुकाध्यक्ष सी.के.बिसेन, महिला तालुकाध्यक्ष सौ.पारबताबाई चांदेवार, नगरपंचायतचे माजी सभापती नेमीचंद आंबिलकर , नगरसेवक पंकज शहारे, नगरसेवीका हिना टेंभरे यांच्या नेतृत्वात देवरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तात्काळ करून शासकीय मदत करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून तालुक्यात मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीतील पिके घर व गोठ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे घर गोठे व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांना उघड्यावर संसार करण्याची पाळी ओढवली आहे एकंदरीत अडचणीत सापडलेल्या देवरी तालुक्यात तातडीने मदत करण्याची गरज आहे म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करून राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करावी अशी मागणी देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे
निवेदन देते वेळी प्रामुख्याने शहराध्यक्ष मुकेश खरोले ,चंद्रपाल शहारे, मंजूषा वासनिक,प्रमिला गावळ , ममता बिसेन, दिनेश गोडसेलवार, सचिन भांडारकर , सुजित अग्रवाल, रविकांत बडवाईक ,रंजन मेश्राम, रवींद्र मेश्राम, रामाजी दर्रो ,मेहतरू कुंजाम , ईश्वर कुंभरे , खुशाल कुंभरे ,इंद्रराज नाईक,राजकुमार भेंडारकर , अरूण आचले , शंकर राहांगडले, सत्यवान देशमुख , प्रमिला गावडकर, प्रशांत देसाई , केशव मेंढे, बबलूभाई खान , डाँ. नरेश कुंभरे, रूखन मडावी , प्रेमलाल मळकाम , देवेंद्र बहेकार, शिवशंकर बहेकार ,हिराराम आचले,दिपक चुटे यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.