ककोडी चिचगड़ मार्ग देत आहे अपघाताला निमंत्रण

0
60

विनोद सुरसावंत ककोडी– देवरी तालुक्यातील चिचगड़ ते ककोडी हा आंतरराज्यीय खड्यामुळे जिवघेणा ठरला असून रात्रीच्यावेळेसच नव्हे तर दिवसाला सुध्दा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आदिवासी भाग असलेल्या या मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमार्ग असून दुरुस्तीच्या नावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कोट्यावधीचे निविदा काढून कंत्राटदारासोबत अभियंता मालसुतो अभियान राबवत असल्यानेच या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरवात  झाली आहे. चिचगड़-ककोडी हा मार्ग २० किलोमिटरचा मार्ग आजच्या घडीला अतिवृष्टीमुळे पुन्हा खराब झाला असून या पावसाने कंत्राटदार व अभियंत्यानी केलेल्या गैरव्यवहाराचे पाप झाकले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.