
गोरेगाव ता.20: -पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्व गरजु लोकासाठी घरकुल योजना सुरू केली.पण गरजु लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याने त्यांना दुसऱ्याच्या घराचा आसरा घेण्याची वेळ आली आहे.
मोहाडी येथील ७० वर्षीय विधवा महीला कमलाबाई लालचंद कोल्हे यांना दोन मुले आहेत.घरात अठराविश्र्व दारीद्र्य असल्याने रोजगाराच्या शोधात दोन्ही मुले गेल्याने ही महीला एकटीच माटीच्या जिर्ण घरात राहत असे.१०आगष्ट ला अतिवृष्टी पडल्याने पाणी वाहुन जाण्यासाठी नाली बांधकाम नसल्याने रस्त्यावरचे पाणी कमलाबाई कोल्हे यांच्या घरात शिरल्याने पाणी साचले. आधीच घर जिर्ण त्यात रस्त्यावर जमा असलेले पावसाळी पाणी घरात जमा झाल्याने नुकसान झाले. घरात रहीवास करता येत नसल्याने शेजारच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यालय गाठले व अर्ज करुन घरकुल देण्याची मागणी केली. पदाधिकारी यांनी पंतप्रधान आवास योजनेतील ड यादीत नाव आहे.दिवाळीनंतर तुमच्या नावाचे घरकुल मिळणार आहे त्यामुळे नुकसान पंचनामा करु नये. पंचनामा झाल्यास दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी आर्थिक लाभ मिळाल्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळणार नाही.असी बतावणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कमलाबाई कोल्हे यांना केली.त्यामुळे नुकसान पंचनामा करण्यात आला नाही.जुने जिर्ण घर त्यातच पाण्याने ओलावा असल्याने कलार समाजातील कार्यकर्त्यांनी कमलाबाई यांना समाज खोलीत आसरा दिला.मुले दोन असुन कमलाबाई मोहाडी येथे एकटीच राहत आहे. वाढत्या वयानुसार त्यांचे आरोग्य खालावलेले आहे.त्यामुळे गावकऱ्यांनी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल केल्याचे गावकऱ्यांनीला सांगितले.
शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात पण त्या योजना गरजु, गरीब कुंटुबापर्यत पोहचत नसल्याने कमलाबाई या अनेक गावांतील विधवा महीलांना लाभ मिळाला नाही.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ड यादीत अनेक धनाढ्य व्यक्तीचे नाव असल्याने विधवा महीलांना डावलल्या जात असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील विधवा महीलांना घरकुल व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे व धनाढ्य,पक्के घरे असलेल्यांचे नाव वगळावे असी मागणी केली जात आहे.