37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता गुजरातच्या अट्टल वाहनचोर टोळीस अटक

गुजरातच्या अट्टल वाहनचोर टोळीस अटक

0
27

blank

चंद्रपूर- २0 ऑगस्ट रोजी मनिविरसिंग जयपालसिंग दिल्लर (वय ४४), रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर यांची ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्र. एम एच 0४ सी. ए. ४0९२ किंमत १,00,000/- रु. घरासमोरून चोरी गेली. तसेच त्याचदिवशी पंकज दिवाकर मिर्शा ( वय ३७) रा. ब्ल्यू पॅराडाईज हॉटेल, भवाजीभाई शाळेजवळ, चंद्रपूर मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार गाडी क्र. एम.एच. १२ डी एस ७८४२ किंमत ४,00,000 रु. ही ब्ल्यू पॅराडाईज हॉटेलच्या बाजूचे पार्किंगच्या ठिकाणावरून चोरी गेली. या प्रकरणी दोन्ही फिर्यादींनी वाहन चोरीची रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार तक्रार दाखल केली. पोलिसांनी अप क्र. ८६२, २0२२ कलम ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
पो.स्टे. रामनगर ठाणेदार पो. नि. राजेश मुळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले व डी.बी. यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास करीत गुन्ह्य़ात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करीत जुनोना रोड, बाबुपेठ येथे जुनोना रोडवरून गुन्ह्य़ात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्र. एम. एच. जी. जे. 0२ डी. एम. 0५५९ ही ताब्यात घेऊन गाडी मालकाचे नाव निष्पन्न करून आरोपी नामे सतनामसिंग प्रतापसिंग बावरी (वय ३२), रा. शेवला, ता. मेहकर, जि. बुलढाणा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्य़ात चोरून नेलेल्या गाड्या या बुद्धनगर, बाबुपेठ वॉर्ड येथून त्याचे नातेवाईकाचे घराशेजारी ठेवलेल्या आहेत, असे सांगितले. यावरून गुन्ह्य़ात चोरून नेलेल्या दोन्ही गाड्या जप्त केल्या. आरोपी सतनामसिंग बावरी यास विचारपूस केली असता त्यांनी फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार, रा. पोसकोर दरवाजा वडनगर, ता. वडगनगर जि. मैसाना राज्य गुजरात हा गुजरात येथे दारूची तस्करी करण्याकरिता गाडी चोरून नेत असल्याची माहिती दिली. दोन्ही आरोपीतांवर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ात तसेच गुजरात राज्यात चोरी, घरफोडी तसेच अवैधरित्या दारूविक्रीचे गुन्हे नोंद आहेत. फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार याचा शोध घेणे सुरू आहे.
दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पत्रकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचार्‍यांनी दोन्ही गुन्हे हे अवघ्या १२ तासांत उघडकीस आणून आरोपी व चोरीस गेलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत. ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्र. एम एच 0४ सी. ए. ४0९२ किंमत १,00,000 रुपये, मारुती सुझुकी कंपनीची वैगन आर, गाडी क्र. एम.एच. १२ डी.एस. ७८४२ किंमत ४,00,000 रुप्ये व गुन्ह्य़ात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्र. एम.एच.जी.जे. 0२. डी. एम. 0५५९ किंमत ७,५0,000 रु. असे एकूण १२,५0,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, रजनीकांत पुलावार, पेतरस सिडाम, अशोक मरसकोल्हे, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशोर वैरागडे, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, नीलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजित शेंडे, विकास जाधव, भावना रामटेके, तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केली आहे.

blank