32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ स्व.विनायकराव मेटे यांना सामूहिक श्रध्दांजली

स्व.विनायकराव मेटे यांना सामूहिक श्रध्दांजली

0
29

गोंदिया:स्थानीय नेहरू चौक गोंदिया येथे अखिल भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा समाज,शिव छत्रपती मराठा समाज, शिवसंग्राम आणि ओबीसी समाज संघटना द्वारे सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
अत्यंत दुर्देवी घटना महाराष्ट्रातील नेते आमदार विनायकराव मेटे यांचे आकस्मिक निधन झाले. निश्चित रूपाने ही सर्व समाजाची खूप मोठी हानी झाली आहे. त्या निमित्तने 21 ऑगस्ट रविवारला संध्याकाळी 5 वाजता  नेहरू चौक गोंदिया
येथे सर्व समावेशक सर्व समाज द्वारे सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्षता मराठा समाजचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली तर अ. भा. मराठा महासंघ आणि शिवसंग्राम संघटनाचे अध्यक्ष राजू तुपकर, जि प सभापती सोनू कुथे, अमर वराडे, विजय बाहेकर,गज्जू फंडे,बंटी पंचबुधे,बबलू कटरे, जाहीर अहमद, प्रकाश धोटे,नगरसेविका सौ भावना कदम, डा. अंकुश शेळके, आणि शीतल तिराले यांनी श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी सतोष जाधव, आलोक पवार, अविनाश पवार, शाम घाटे,अनिल काळे, अरुण जाधव, बॉल्या केकत, मोहन काळे,सागर कदम, राजू इंगळे, कपिल केकत,विनोद इंगळे,पंकज तुपकर,राजीव शेळके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन मराठा समाजाचे सचिव आनी अ.भा. मराठा महासंघ चे उपविभागीय उपाध्यक्ष दीपक कदम यानी केले.अ.भा.मराठा महासंघ गोंदिया, सकल मराठा समाज, शिव छत्रपती मराठा समाज,शिव संग्राम संघटना
आणि सर्व समाज संघटना यानी आयोजन करून समाजचे कार्य पूढ़े नेण्याचा संकल्प घेतला