29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ बेरार टाईम्सचा दणका… महसूल विभागात एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचारी प्रकरणावर लक्षवेधी

बेरार टाईम्सचा दणका… महसूल विभागात एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचारी प्रकरणावर लक्षवेधी

0
50

blank

विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांनी 23 आँगस्टला लावली लक्षवेधी
लक्षवेधीवर कक्ष अधिकारी केतन काळेंनी मागितले गोंदिया/भंडारा जिल्हाधिकार्यांना मागितला अहवाल

गोंदिया,दि.24:- गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्तीच्या तारखेपासून 19 कर्मचारी हे सेवा संलग्नतेच्या नावावर जिल्हाधिकारी व इतर कार्यालयात कार्यरत असून यासोबतच इतर अधिकारी कर्मचारी सुध्दा एकाच जागेवर ठाण मांडून असल्यासंंबधीचे चित्र बेरार टाईम्स वृत्तपत्राने उघडकीस आणले होते.विशेष म्हणजे या वृत्ताचा आधार घेत गोंदिया भंडारा जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांनी लक्षवेधी लावली असून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचारी व तालुका स्तरावर रिक्त पदामुळे कामावर ताण होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.या लक्षवेधी प्रश्नावर माहिती देण्यासाठी महसुल विभागाचे कक्ष अधिकारी केतन काळे यांनी 23 आँगस्टरोजी जिल्हाधिकारी गोंदिया व भंडारा यांना पत्र देऊन तत्काळ माहिती मागविली आहे.यानंतर तरी जिल्हाप्रशासन आपल्या भूमिकेत बदल करुन एकाच ठिकाणी कार्यरत असलेले व मूळ आस्थापनेवर कधीच न गेलेल्यांना कार्यमुक्त करते की या लक्षवेधी प्रश्नाला थातूरमातूर उत्तर देऊन वेळ काढून आमदारांचे समाधान करुन प्रकरण शांत करते याकडेही लक्ष लागले आहे.
बेरार टाईम्स साप्ताहिकांने यांसदर्भात 5 आँक्टोंबर 2021 रोजी त्या निवडक कर्मचार्यावर जिल्हाधिकारी मेहरबान, 13 आक्टोंबर 2021 रोजी आम्ही आमच्या मर्जीने नव्हे तर जिल्हाधिकार्याना आमची गरज तर 27 एप्रिल 2022 रोजी सेवासंलग्नतेच्या भितीनेच आमगाव तहसिल कार्यालयातील ५७ वर्षीय अव्वल कारकूनाला गमवावे लागले प्राण ,18 मे रोजी कर्मचार्यांच्या जिवावर उठले जिल्हाधिकारी कार्यालय या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन शासन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.या प्रकाशित सर्व वृत्तांची आमदार डाॅ.परिणय फुके यांनी दखल घेतली असून या प्रश्नावर लक्षवेधी लावल्याने महसुल विभागातील बदली घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.blank

एकीकडे आमगाव,गोंदिया,देवरी तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतांना त्यांना त्यांच्या मूळ जागेवर परत पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून बदली करणारे अधिकारी मात्र आंधळे होऊन बसतात अशा या अधिकार्यामुळे आधीच इतर कामाचा बोझा घेऊन काम करीत असलेले अनेक कर्मचारी कार्यरत आहेत.त्यांना दिलासा देण्याएैवजी त्यांच्यावरच अतिरिक्त कामाचा ताण व बदलीचा ससेमिरा लावून पारदर्शक कार्यप्रप्रणालीच्या नावावरच भ्रष्टप्रणालीचा कारभार लावण्यात आले असे म्हणने वावगे होणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाने नियम धाब्यावर बसवून सेवानिवृत्तीला एक वर्ष असलेल्या आमगाव तहसील कार्यालयात कार्यरत एका ५७ वर्षीय लिपिकाच्या सेवासलंग्नतेचा प्रयत्न फसल्यानंतर परत एका दिव्यांग कर्मचार्यावर अतिरिक्त कामाचा बोझा देण्याचा प्रकार आमगाव तहसिल कार्यालयात सुरु केल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील आमगाव तहसिल कार्यालयात सर्वात कमी कर्मचारी कार्यरत असून गेल्या महिन्यातच एक महिला कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकली.त्यातच एका 57 वर्षीय कर्मचार्याचा या अतिरिक्त कामाच्या तणावामुळे मृत्यू झालेला असतानाच परत दिव्यांग कर्मचारी असलेल्या व्यक्तीला अतिरिक्त भार देण्याचा प्रकार म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात दशकानुदशके ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांची पाठराखण करण्यासारखेच झाले आहे.आत्तापर्यंतच्या जिल्हाधिकारी,अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी याकडे कानाडोळा करीत त्या ठाण मांडलेल्याची बाजू घेतली होती,मात्र विद्यमान जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी जे नेहमीच आपण पारदर्शक कार्यप्रणालीला महत्व देणारे आणि कुठल्याही गैरप्रकाराला व नियमबाह्य कामाला आमच्याकडे जागा नाही असे सांगणारे विद्यमान अधिकारीही आत्ता त्या कर्मचार्यांच्यासमोर नांगी टाकून बसले असे म्हणायला काहीही हरकत नाही.सेवासल्गनतेच्या नावावर हे कर्मचारी एकाच ठिकाणी बसले असून यात आमगाव तहसिल कार्यालयातील अनेक कर्मचार्यांचा समावेश आहे.कर्मचारी कमी असल्याने तहसिलदार सुध्दा कामाचा व्याप बघून त्रस्त झाल्याचे चित्र बघावयास मिळते.

27 April Berar times Epaper https://www.berartimes.com/147278/ via @berartimes वाचा -सेवासंलग्नतेच्या भितीनेच आमगाव तहसिल कार्यालयातील ५७ वर्षीय अव्वल कारकूनाला गमवावे लागले प्राण

सेवासंल्गनेतेच्या भितीने एकाने जीव गमावला,आत्ता दुसर्याचाही जीव घेणार काय?

सेवासंल्गनेतेच्या भितीने एकाने जीव गमावला,आत्ता दुसर्याचाही जीव घेणार काय?

18 May Berar times Epaper https://www.berartimes.com/148861/ via @berartimes