42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकची समोरासमोर धडक; दोन ठार तर दोन गंभीर जखमी

ट्रकची समोरासमोर धडक; दोन ठार तर दोन गंभीर जखमी

0
36

blank

कारंजा- नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्याजवळ ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.सुखदेव सिंग मंगलसिंग सरदार (४७, रा. भिलाई, छत्तीसगड) आणि मुजीब वैजाद शेख (२६, रा. शिवगाव, ता. वैजापूर) अशी मृतांची नवे आहेत तर सतपाल रामशीग जरवाल (३२, रा. शिवगाव, ता. वैजापूर),हरपाल सिंग प्याराशिग सरदार, रा. भिलाई हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती शेलुबाजार पोलिसांनी कारंजा ग्रामीण पोलिसांना दिली असता कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार इंगळे तसेच उपनिरीक्षक धनराज राठोड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

blank