36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात:वैजापूरचे 3 तरुण ठार, 6 जण जखमी

मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात:वैजापूरचे 3 तरुण ठार, 6 जण जखमी

0
284

जळगाव-  मध्यप्रदेशच्या हद्दीत जामटी गावाजवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात वैजापूरच्या चोपडा तालुक्यातील 3 तरुण ठार झाले, तर 6 जण जखमी झाले. पंकज प्रकाश बारेला (वय 17) जगदीश केरसिंग बारेला (वय 19), नीलेश शांतीलाल बारेला (22) अशी मृतांची नावे आहेत.

जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे तरुण कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी मध्यप्रदेशात जात होते. त्याचदरम्यान त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

blank

अपघाताबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी येथील वारला तालुक्यात आज पहाटे हा अपघात झाला. वैजापूर येथील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते. त्याचदरम्यान अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. परंतु घटनास्थळावर 3 तरुण जागीच ठार झालेत. तर 6 जखमी झाले. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, मृत व जखमींची नावे अद्याप कळू शकली नाही

blank