
गोरेगाव,दि.01ः- येथील जगत कला वाणिज्य व हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी सौ. कृणाली लोकेश हरिणखेडे) वय 20,राहणार मोहाडी,ता.तुमसर जिल्हा भंडारा या 20 वर्षीय विवाहित महिलेने कटंगी जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 1 सप्टेबंरला दुपारच्या सुमारास घडली.सदर विवाहित युवतीने उडी घेतल्याचे आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच आपत्ती निवारण शोध पथकाला व गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.लगेच पोलिसांनी आपत्ती निवारण पथकाच्या माध्यमातून शोध मोहिम राबवित सदर विवाहित युवतीचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढले.





