पांगोली नदी पुनरूज्जीवनावर खा.मेंढेंची पांगोली नदी बचाव समितीसोबत चर्चा

0
26

गोंदिया,दि.02 :- पांगोली नदी बचाव कृती समितीच्या आग्रहावर गोंदिया शहराजवळून वाहणार्या पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनाच्या विषयाला घेऊन खासदार सुनिल मेंढे यांनी पुढाकार घेत आज 2 सप्टेंबराल छोटा गोंदिया मार्गावरील पांगोली नदीशेजारील महाकालघाट येथे भेट देत नदीची पाहणी केली.तसेच पाहणीनंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत नदीच्या पुनरुज्जीवन, संवर्धनसाठी चर्चा केली.यावेळी अशोक इंगळे,भावना कदम,प्रा.माधुरी नासरे,संजय कुलकर्णी,रोशन जायसवाल,जयंत शुक्ला,अपुर्व मेठी, नारायण चांदवानी,गुड्डू चांदवानी, राजेश कनोजिया,गजेंन्द्र फुंडे,धर्मिष्ठा सेंगर,पुजा तिवारी,मिना डुंभरे,प्रशांत बोरकुटे,राजेश तावाडे,धनंजय रिनाईत, जलसंधारण विभागाचे अधिकारी अनंत जगताप आदी मान्यवर चर्चेत सहभागी झाले.

या बैठकीत पांगोली नदी बचाओं अभियान कृती समितीचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ता,विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, नदी किनार्यावरील गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनाची गरज यावर पांगोली नदी बचाव अभियान समितीचे मुख्य सयोंजक तिर्थराज उके यांनी प्रास्तविक माहिती दिली.तसेच आभार माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी मानले.संचालन दिपक कदम यांनी केले.बैठकीला ग्राम चुलोद, खमारी, फुलचूर, टेमनी, तुमखेडा खुर्द , कारंजा, मोहगांव बुज., गोंदिया शहर,छोटा गोंदिया, गोविंदपूर, सिव्हिल लाईन परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीच्या यशस्वीतेसाठी तिर्थराज ते. उके,अनिल शरणागत,गोल्डी गावंडे,संतोष कुसराम,अनिल ढोमने, दुर्गा गलोले,कैलाश शेंडे, चुलोद सरपंच लतीश बिसेन, गोपालकृष्ण ठाकूर, एम.ए.ठाकूर, खमारी सरपंच होमेंद्र भांडारकर, पंस.सदस्य कनिराम तावाडे, फुलचूर सरपंच मिलन रामटेककर,सुकचंद येळे, दिपक गायधने,राजेश देसकर,धनलाल भुते,महादेव आमकर,गोपाल बनकर,नाईकराम शरणागत,रामनाम बिसेन,दिपक कदम,राजेंद्र जगताप, डाँ.योगेश मानकर,संदीप रहांगडाले,रमेशलाल मेश्राम,विजयकुमार कावळे आदीनी सहकार्य केले.