शिक्षक दिनी गिरीपूंजे शिक्षक दाम्पत्यांचा सत्कार

0
16

तिरोडा-शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा. शिक्षक डी.आर.गिरीपूंजे व त्यांच्या पत्नी सहा.शिक्षिका डी.डी.गिरीपूंजे यांचा गोंदिया मध्यवर्ती को आपरेटिव्ह बॕकेचे सचिव डाँ.अविनाश जायस्वाल यांचे अध्यक्षतेखाली नगर परिषद तिरोडाचे माजी ऊपाध्यक्ष राजेश गूणेरिया यांचे हस्ते जेष्ठ पञकार दिपक जायस्वाल ,विनय खेताडे ,चंद्रकुमार मलेवार विखेश छूगाणी यांच्या प्रमुख ऊपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डी.आर. गिरीपूंजे हे भिवरामजी विद्यालय वडेगांव येथे सहा.शिक्षक असून त्याच्या पत्नी डी.डी.गिरीपूंजे ह्या नगर परिषद तिरोडा येथे सहा. शिक्षिका पदावर कार्यरत आहेत .दोघांनी ही ऊच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली व त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी करून घेतात असे मत  जायस्वाल यांनी व्यक्त केले तर दिपक जायस्वाल,राजेश गुणेरीया यांनी गिरीपूंजे दाम्पत्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचे गुणगौरव केले .
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिपक जायस्वाल यांनी केले .