ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी शाळेत शिक्षक दिन उत्साहात

0
11

गोरेगाव(6 सप्टेंबर)-तालुक्यातील स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथे डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे व वीद्येची देवी शारदा मातेचे प्रतीमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले. तदनंतर स्वयंशासन घेण्यात आले विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मूमीका स्वीकारून अध्यापन केले. तदनंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला
अध्यक्ष स्थानी विद्यार्थ्यांमधून प्राचार्यांची भूमिका करणारे हर्ष तूरकर होते.
प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षक कार्तिक पटले यांनी प्रस्तुत केले.याप्रसंगी विद्यार्थी-शिक्षक प्राची बोजेवार,अश्वीनी बीसेन,शूशील कथलीवार,अप्राजीता डहाके, वीजया पारधी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी-शिक्षक अप्राजीता डाहाके म्हणाले ,की कितीही युगांतर झाले तरीही,विद्यार्थी घडवून,त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रक्रिये मध्ये शिक्षकांची भूमीका अन्यन्य साधारण महत्वाची असते.शीक्षक हा शीलवान असावा,याचा अनुभव
म्हणून आज शिक्षकाची भूमिका नीभवतांना आले आपल्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखावे. शिक्षक हा शीलवान, शिस्तप्रिय व क्षमाशील आसावा तसेच आज
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आजचे कामकाज स्वंयशासन कार्यक्रम सांभाळले.
या प्रसंगी संचालन रोहिणी बीजेवार व आभार कानात कटरे यांनी मानले. शेवटी वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली