
गडचिरोली- तालुक्यातील विजयनगर येथील एका व्यक्तीच्या घरी शितळाचे मास असल्याची गुप्त माहिती मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्राधिकारी मिळाली. यावरून वनकर्मचार्यांनी सदर इसमाच्या घरी जाऊन पाहणी केली असता एका स्टिल डब्यामध्ये शितळाचे शिजविलेले मांस आढळून आले. याप्रकरणी वनकर्मचार्यांनी५ सप्टेंबर रोजी आरोपी किशोर हिमांशू बरकंदाज यास अटक केली.
मार्कंडा वनपरिक्षेत्रांतर्गत गुडापल्ली उपक्षेत्रातील गुंडापल्ली नियतक्षेत्रातील विजयनगर येथील किशोर हिमांशू बरकंदाज यांच्या घरी चितळाचे मास असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी मिळाली. वनकर्मचार्यांनी बरकंदाज याच्या घरी धाड टाकून शितळाचे शिजलेले मांस जप्त केले. याप्रकरणी अधीक चौकशी केली असता सदर मांस विजयनगर येथील अजित नारायण रॉय व उत्तम निरोध बाच्छाळ यांच्या खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले. यावरून वनाधिकार्यांनी तिघाविरुद्ध वनगुन्हा नोंद करून किशोर बरकंदाज यास अटक केली. ७ सप्टेंबर रोजी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. या घटनेतील अजित रॉय व उत्तम बाच्छाळ हे दोन आरोपी फरार असून इतर आरोपी समाविष्ठ असल्याची अंदाज वर्तविला जात आहे.
पुढील तपास आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहूलसिंग टोलीया, प्रकाष्ठ निष्कान अधिकारी प्रदीप बुधनवार, मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांचे नेतृत्वात गुंडापल्लीचे क्षेत्रसहायक आर. पी. मांडवकर, वनपाल डी.एम. शेळके, रवींद्र कुडावले, एम.वही. कोकनरे, जि.एस. मेर्शाम, पी.एच. परसवार, एस.जी. हजारे, व्ही. बगडे, लिपटे, आग्रे, मेर्शाम करीत आहेत.