** गोंदिया-चंद्रपुर रेल्वे मार्गावरिल प्रकार
* विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान*
सड़क अर्जुनी::—- तालुक्यातील पांढरी/गोंगले येथे पुरातन काळापासुन रेल्वे स्टेशन आहे.या ग्रामीण परिसरात वाहतुकीच्या सोई कमी उपलब्ध असल्या कारणाने, रेल्वेचा प्रवास प्रवाशांना सोईचे व सुकर ठरत आहे.पण दररोज होत असलेली पेंसेजर गाड्यांची लेटलतीफी प्रवाशांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.
परिसरातील वाहतुकीच्या अपु-या सोई अभावी,पांढरी/गोंगले रेल्वे स्टेशन या परिसरातील ३२ते ३५ गावांसाठी केन्द्रस्थानी ठरलेला आहे.नागझिरा अभयारण्याच्या एका टोकाला खेटून वसलेला,नैसर्गिक सौंदर्याने नटलेला,रेल्वे स्टेशन प्रवाशांना भुरड पाडणारा ठरत आहे.येथून मोठ्या प्रमाणात दोन्ही दिशेला प्रवास करणा-या प्रवाशांची नेहमीच या रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पहावयास मिळत असते.
येथुन मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, शैक्षणिक कार्याकरीता दोन्ही बाजुला,गोरेगाव,गोंदिया,साकोली,,मोर/अर्जुनी,ब्रम्हपुरी येथे शैक्षणिक कार्याकरीता जात असतात.पण रेल्वे च्या लेटलतिफी कारणाने आपल्या महाविद्यालयीन वेळेवर पोहचू शकत नाही.त्याकारणाने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड विद्यार्थी करत आहेत.तसेच गोंदिया येथे या परीसरातील बहुतेक नागरिक वैद्यकीय औषधोपचार करण्याकरीता नेहमीच जात असतात.त्यांना पण पेंसजर गाड्यांच्या नेहमीच्या लेटलतिफीच्या कारणाने कोंडी होत असुन, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
*वाहतुकीचा दुसरा,पर्याय नाही*
पांढरी/गोंगले परिसरात वाहतुकीच्या अपु-या सोई सुविधा अभावी, बहुतेक नागरीकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रेल्वेच्या भरवशावर अवलंबून राहावे लागते.वरून दिवसाला गोंदियाकडे जाणारी सकाळी ११ वाजेची एकच फेरी असल्या कारणाने,विद्यार्थी,प्रवाशांचा त्रास वाढलेला दिसत आहे.पेसेंजर रेल्वे गाड्यांचाच्या लेटलतिफीचाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.