
*रत्नागिरी*-क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था यांच्या विद्यमाने यावर्षी राज्यस्तरीय गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्वप्निल पवार (दापोली, माझा बाप्पा), सौ. स्वाती पाटील, (सातपूर नाशिक, पर्यावरण पूरक सजावट) आणि अपूर्वा झोंबाडे (भोसरी, पुणे माझी गौराई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेमार्फत संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. गणेशोत्सव स्पर्धेत पर्यावरणपूरक बाप्पाची सजावट, कुटुंबासाठी माझा बाप्पा आणि महिलांसाठी माझी गौराई अशा तीन स्पर्धा होत्या.
माझा बाप्पा स्पर्धेत प्रथम स्वप्निल पवार (पालगड दापोली), द्वितीय दिपीका पवार (पवारसाखरी गुहागर), तृतीय जगदीश पवार (घोडपदेव मुंबई) यांनी क्रमांक मिळवले. पर्यावरणपूरक सजावट स्पर्धेत स्वाती पाटील (सातपूर नाशिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वाचन संस्कृतीवर आधारित पुस्तके वाचा. मोबाईलचा अतिरेक टाळा हा संदेश देणारा देखावा केला होता. द्वितीय क्रमांकप्राप्त तानाजी पवार (कोरेगाव सातारा) यांनी शेतकरी आत्महत्या, नापिक जमीन, पिकाला हमीभाव न मिळणे, रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर, कर्ज, सावकारी वगैरे हा देखावा साकारला. तृतीय क्रमांकप्राप्त प्रशांत वर्मा (खारेगाव ठाणे) यांनी देशी झाडे लावा, देशी झाडे वाचवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा देखावा केला. माझी गौराई स्पर्धेत प्रथम अपूर्वा झोंबाडे (भोसरी पुणे), द्वितीय सान्वी म्हसकर, (पवारसाखरी गुहागर) आणि तृतीय क्रमांक प्रियांका पवार (चिपळूण) यांनी यश मिळवले.
सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार असून वार्षिक स्नेहसंमेलनात विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. या तीनही स्पर्धासाठी परीक्षक म्हणून रसिला पवार, सुप्रिया पवार, श्रेया पवार, ऋचा पवार, तुषार विश्वासराव, सुशांत विश्वासराव, संदेश पवार यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजन पवार, सचिव अविनाश पवार, कार्याध्यक्ष सचिन पवार, खजिनदार विकास पवार, उपाध्यक्ष सचिन पवार, राजेंद्र पवार, तुषार विश्वासराव, सनीदादा पवार, सहकार्याध्यक्ष सचिन पवार, सुशांत विश्वासराव, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदेश पवार, सहखजिनदार अमित पवार, सहसचिव सूरज पवार यांनी मेहनत घेतली.