
शरद युवा यात्रेचे गोंदिया येथे जोरदार स्वागत
गोंदिया,दि.30ः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व खासदार प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस द्वारा आयोजित शरद युवा सवांद यात्रेचे आज गोंदिया येथील ग्रीनलँड लॉनं येथे आगमन झाले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, युवक कार्याध्यक्ष नितीन भटाळकर, युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, जिल्हा निरीक्षक शरभ मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खा.प्रफुल पटेलच्या प्रयत्नाने या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता अदानी पॉवर प्रोजेक्ट, बिरसी विमानतळ, भेल या सारखे उद्योग आणण्याचे काम केलें आहे. आगामी काळात तरुणांनी पुढे येवुन पक्ष संघटना बळकट करण्यास हातभार लावावा तसेच काम करणार्या युवकांना पक्ष संघटनेत संधी देण्याचे काम पक्ष करेल. पुढील काळात होणार्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगर पंचायत व अन्य महत्वाच्या निवडणुकांमध्ये तरुणांना संधी देऊन अधिक ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न आपण सर्वांनी करावे असे आवाहन श्री जैन यांनी केले.
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे सर्वसमावेशक नेतृत्त्व असून सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देणारे तसेच कामगार, कष्टकरी, शेतकरी व सर्व सामान्यांसाठी झटणारे आहे. त्याचे विचार तळागाळातील जनते पर्यत पोहोचवण्याचे काम युवकांनी करावे’, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले. या यात्रेत सर्वश्री राजेंद्र जैन, महेबुब शेख, गंगाधर परशुरामकर, नितीन भटाळकर, केतन तुरकर, शरभ मिश्रा, अखिलेश सेठ, किशोर तरोने, नितीन टेंभरे, माणिक पडवार, लिकेश चिखलोंढे, गोविंद लीचडे, इंदल चव्हाण, सुनिल पटले, शैलेश वासनिक, राहुल वलदे, राज शुक्ला, नाजीम खान, संदिप पटले, निशीकांत बनसोड, आरजू मेश्राम, कान्हा बघेले, कपिल बावनथले, श्रीकांत ठाकरे, विक्की भाकरे, पिटू बनकर, सुरेंद्र रहांगडाले, प्रतीक पारधी, प्रशांत बालसंमत, योगी येडे, लखन बहेलिया, रौनक ठाकुर, सौरभ रोकडे, करण टेकाम, पंकज चौधरी, राजेश रहांगडाले, लोकनाथ हरिंनखेडे, विक्रम मानेकर, तुषार ऊके, श्रेयस खोब्रागडे, अविनाश महावत, अमित जतपेले, लवकुमार माटे, दर्पण वानखेडे, शरभ मिश्रा, मंगेश रंगारी, राजेश रामटेके, भिमटेजी, कुणाल बावनथले, सदाशिव वाघडे, वामन गेडाम सहीत मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थीत होते.
याप्रसंगी शरदचंद्र पवार, खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्ष विचारधारेवर विश्वास ठेऊन ग्राम कटंगीकला येथील सर्वश्री अखिल अजित सिंग, निलेश उईके, देवेंद्र गोखे, हेमेंद्र ठाकुर, प्रदीप चौधरी, विवेक बीसेन, ग्राम रजेगाव येथील शक्ती कटरे, राजकुमार कुंजाम, मितराम भगत, राकेश रीनायत, नासीर भाई, शंकर प्रजापती, विनय लांजेवार, जयेंद्र ठाकरे, रीतिक बावांथडे, वैभव माणेकर, रोहित वासनिक, करण मानेकार, हनी डहाट, महेंद्र पारधी सहित शेकडो कार्यकर्तानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार राजेंद्र जैन, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून पक्षात स्वागत करण्यात आले.