आयडॉलच्या प्रवेशास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

0
12

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या  जुलै सत्राच्या  एकूण २४ अभ्यासक्रमाच्या प्रवेशास १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आजपर्यंत या सत्रात ३५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतला आहे.

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

यूजीसीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या  एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क  या  तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश १५ ऑक्टोबर  २०२२ पर्यंत होतील.

एमएमएस व एमसीएच्या प्रवेश परीक्षेच्या अर्जास १० ऑक्टोबरपर्यंत  मुदतवाढ

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी  एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन  (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता दिली आहे.याच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेच्या अर्जाची तारीखही  १० ऑक्टोबरपर्यंत  वाढविण्यात आलेली आहे. दूरस्थ माध्यमातून असलेल्या आयडॉलच्या एमएमएस व एमसीए या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक forms.epravesh.com/MumbaiUniversity/Default.aspx आहे.

पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम  व  पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर  २०२२  पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

अभ्यासक्रम निहाय आजपर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

अ. क्र. अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या
१. प्रथम वर्ष बीए ४५००
२. प्रथम वर्ष बी. कॉम. ५७००
३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स ६००
४. प्रथम वर्ष एमए ३४००
५. प्रथम वर्ष एमकॉम ६७००