
भाजयुमो जिल्हाध्यक्ष कटरेच्या नेतृत्वात युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी छगन भुजबळच्या विरोधात नारेबाजी करत निषेध नोंदविला
गोंदिया: राष्ट्रवादी नेते व माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेची फ़ोटो शाळेतुन हटविन्या बाबद दिलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने निषेध नोंदविन्यात आला. राष्ट्रवादी जिल्हा कार्यालया जवळ सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करुण छगन भुजबळ विरोधात नारेबाजी करण्यात आली. भुजबळ यांच्या विधानामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने भाजयुमो संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध व्यक्त करत आहे. भुजबळ यांनी सार्वजनिक माफी मागावी अन्यथा पूर्ण जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा भाजयुमोने दिला.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात आयोजित या निषेध मोर्च्यात भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हा महामंत्री कुणाल बिसेन, हर्ष मोदी, नुरुनाथ दिहारी, पारस पुरोहित, विनोद चांदवानी, तालुकाध्यक तिजेश गौतम, शहर अध्यक्ष पलाश लालवानी, विलास बागड़कर, प्रवीण बोपचे, देवराम चूटे, ऋतुराज मिश्रा, शुभम तिवारी, पंकज भिवगड़े, पुरुषोत्तम ठाकरे, विवेक चौधरी, अविनाश जयसिंघानी, पंकज उइके, सत्यवान परसुरामकर, गणेश कापगते, निखिल मेश्राम, राकेश कापगते, निखिल भूरे, द्रोणराज कापगते, प्रणय वालदे, अमित आर्य, हिमांशु राउत, रत्नदीप टेम्भूर्ने, हितेश कापगते, अजय लिल्हारे, मंगेलश गिरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.