रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन!- तुकाराम मुंढें

0
44

पुणे: आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून तुकाराम मुंढे यांना आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार देण्यात आला. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. ६ ऑक्टो. रोजी रात्री दीड च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक, वरिष्ठ डॉक्टर उपस्थिती आहेत का पाहण्यासाठी मुंढेंनी पाहणी दौरा केला.
पुण्यातील आळंदी, वाघोली येथे पाहणी दौरा केला, पण डॉक्टर उपस्थित असल्याने निलंबनाची कारवाई टळली. रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांना शिस्त लागावी, कार्यक्षमतेने ती सुरु राहावीत. अशी अपेक्षा असल्याचे मुंढे म्हणाले.