
भंडारा -: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 24 व्या अखिल भारतीय महाधिवेशनाला दिनांक 14 ऑक्टोबर 2022 पासून विजयवाडा आंध्र प्रदेश येथे सुरुवात झाली. अधिवेशना करता महाराष्ट्रातून आलेल्या 25 प्रतिनिधींनी सह रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात भंडारा जिल्ह्यातून काॅ. शिवकुमार गणवीर व काॅ.हिवराज उके तर गोंदिया जिल्ह्यातील काॅ. हौसलाल रहांगडाले यांचा समावेश आहे.
१४ ते १८ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या महाअधिवेशनाची सुरवात भव्य महारॅली ने झाली . संपूर्ण विजयवाडा शहर लाल पताका , लाल झेंडे व कम्युनिस्ट चळवळीतील जन नायकांच्या फोटो ने सजविण्यात आले आहे. . आंध्रप्रदेशाला कम्युनिस्ट चळवळी चा दैदिप्यमान इतिहास आहे . जमीनीच्या हक्कासाठीचा १९४७ – ४८ तेलंगाना सशस्त्र क्रांती लढा , निजाम – रजाकारांच्या विरुद्धच्या ऐतिहासिक संघर्षच्या पाऊल खुणा आजही आंध्र – तेलंगाणा च्या गावागावात पहावयास मिळतात . या जनयुद्धात शहीद झालेल्या हजारों कम्युनिस्ट योद्ध्यांचे स्मृतिस्तंभ आजही या भागात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात लढलेल्या जनसंघर्षाची साक्ष देतात . देशाच्या विविध भागातुन व विशेषतः आंध्र – तेलंगाना च्या सुदूर भागातून लाखांच्या वर आलेल्या जनसैलाबाने विजयवाडा शहर अक्षरशः लालेलाल झाले होते . तरुणांची असलेली लक्षणिय संख्या व हजारों रेड गार्डस् (लाल सैनिक ) चे शिस्तबद्ध पदसंचलन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . कॉ . तिरुमलाई व कॉ . विकी माहेश्वरी यांच्या नेतृत्वात पक्षाच्या विद्यार्थी ( AISF ) व युवा (AIYF ) आघाडी द्वारा काढण्यात आलेला कोल्लम (केरळ ) ते विजयवाडा यंग कम्युनिस्ट मार्च कालच विजयवाडा येथे पोहचला . कष्टकरी कामगार शेतकरी मजुर विद्यार्थी युवकांचा सहभाग असलेल्या भव्य दिव्य महारॅलीचे इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये भव्य सभेत रुपांतर झाले . पक्षाच्या सांस्कृतीक आघाडीने – इप्टाने सादर केलेल्या क्रांतिगिते – तेलगू लोकगीतांनी ,लोकनृत्याने सभेची सुरवात झाली . सभेसाठी उभारण्यात आलेल्या भव्य सभामंचावर पक्षाचे महासचिव कॉ . डि राजा , राष्ट्रीय सचिव कॉ . अमरजित कौर , कॉ डॉ . भालचंद्र कांगो, कॉ . अतुलकुमार अंजान , पक्षाचे राज्य सभा खासदार कॉ . संतोषकुमार , कॉ . एनी राजा , माजी खासदार कॉ . अजित पाशा , कॉ . सुधाकर रेड्डी , . कॉ . डॉ .नारायणा , कॉ . डॉ . रामकृष्णा , कॉ . पल्लव सेन गृप्ता , कॉ . नागेंद्र ओझा सह विविध देशातील ( फ्रांन्स , बांग्लादेश , पाकीस्तान , द. आफ्रिका , स्पेन , अमेरिका, रशिया , चिन , नेपाळ , श्रीलंका, ग्रीस, पोर्तुगाल , क्युबा , दक्षिण कोरिया ,लाओस , व्हियतनाम ) कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी हजर होते . सभेचे प्रास्ताविक डॉ . नारायणा यांनी केले . पक्षाचे महासचिव कॉ . डि .राजा यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले . आपल्या घणाघाती भाषणामध्ये कॉ . राजा यांनी २४व्या | महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमी वर सध्याच्या राजकीय स्थितीचे विश्लेषण करून पक्षाला आणखी बळकट करण्याचे आवाहन केले . जनाविरोधी फॅसिस्ट संघाच्या नेतृत्वातील भाजपा – नरेंद्र मोदी सरकारचा पाडाव करण्याची ऐतिहासिक जबाबदारी कम्युनिस्ट – डाव्या पक्षावर असून आज उपस्थित असलेल्या लाखो लाल सैनिकाच्या साक्षीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष येत्या काळात अदाणी अंबाणी – नववित्त भांडवलशाहीचे दलाल असलेल्या या फॅसिस्ट सरकारचा पराभव करण्याचे आव्हान स्विकारत असल्याचे त्यांनी सांगितले . या देशातला लाल झेंडा फॅसिझम च्या संकटापासून जनतेचे संरक्षण करण्यास कटीबद्ध असून या लढाई साठी पक्ष कार्यकर्त्यांनी सर्व पातळीवर तयार रहाण्याचे आवाहन त्यांनी केले. असेही काॅ हिवराज उके जिल्हा सचिव भाकप यांनी विजयवाडा येथून सांगितले आहे.