माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची प्रभाविपणे अंमलबजावणी व जनजागृती करा

0
29

डॉ. दिनेश सुतार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी

गोंदिया, दि. 17 – जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी आरोग्य विषयक कामाचा आढावा घेतला सदर आढावा सभेत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यात नवरात्री उत्सवाचे अनुषंगाने 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची मर्यादा 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्या अनुषंगाने गावातील प्रत्येक 18 वर्षावरील महिला ,गरोदर स्त्रिया, किशोरवयीन मुली व बालके यांची तपासणी 100% होण्याच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना त्यांनी आढाव सभेत दिल्या. मोहिमेदरम्यान मानव विकास शिबिरे स्त्रीरोग, तपासणी शिबिरे आयोजित करून समुपदेशन, तपासणी व जनजागृती या त्रिसूत्रीवर भर देऊन मोहीम यशस्वी करण्यात यावी.
विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण ,हिवताप, क्षयरोग ,कुष्ठरोग ,सांसर्गिक आजार, सिकलसेल, नियमित लसीकरण, कोविड लसीकरण व तपासणी याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, प्रधानमंत्री मातृवदन योजना ,जननी सुरक्षा कार्यक्रम व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ,मातृत्व अनुदान, मानव विकास इत्यादी विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळवण्याच्या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी यांनी पडताळणी करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
गर्भधारणा पूर्व सेवा, प्रसुती पूर्व व पश्यात सेवा, एनिमिया मुक्त भारत, विप्स इत्यादी कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या द्रुष्टिने आरोग्य कर्मचारी,आशा सेविका ,अंगणवाडी सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी एकत्रितपणे सहकार्याने कामे करणे बाबत मार्गदर्शक सूचना यावे वेळी दिल्या.
माता मृत्यू व बालमृत्यू टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, कीटकशास्त्रीय सर्वे ,एकात्मिक रोग सर्वेक्षण,ई- संजीवनी ओपीडी वाढविण्यावर भर देण्यात यावा.
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्व आरोग्य संस्था डिजिटल स्वरूपात पोहोचवण्याकरता जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा हेल्थ आयडी बनवणे करिता व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
जिल्ह्यात हिवताप व डेंगू रुग्णांची वाढती संख्या बघता कीटक शास्त्रीय सर्वे वाढवणे, गुहभेटी दरम्यान कंटेनर सर्वे करून लोकांमध्ये कोरडा दिवस पाळणे, डास उत्पत्ती स्थानकामध्ये गप्पी मासे सोडणे,पाणी वाहते करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविणे गरजेचे असल्याचे सूचना दिल्यात.
यावेळी डॉ. नितीन कापसे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी क्षयरोग कामाचा आढावा, डॉ. वेदप्रकाश चौरागडे जिल्हा हिवताप अधिकारी तर डॉ. निरंजन अग्रवाल यांनी साथरोग कामाचा आढावा घेतला.