
आमगावात काढला जनआक्रोश मोर्चा
आमगाव,दि.19ः- धानाला प्रोत्साहनपर १००० रूपये बोनस देण्यात यावे, अतिवृष्टी असो की वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला त्वरित देण्यात यावा, याशिवाय निराधारांचे थकीत असलेले अर्थसहाय्य, प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदी, महागाई तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांना घेवून आज आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,नरेश माहेश्वरी,रमेश ताराम, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, कमलबापू बहेकार,कविता रहांगडाले, सुभाष यावलकर यांनी या आंदोलनाला मार्गदर्शन केले.
आमगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, महागाई, जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती कमी करून जनसामान्यांना दिलासा व न्याय देण्यात यावा. अतिवृष्टी, खते व किटक नाशकांच्या वाढत्या किंमतीने शेतकरी हवालदील झाला आहे करिता महाराष्ट्र शासनाद्वारे धानाला 1000/- रूपये बोनस देण्यात यावा. महाविकास आघाडी सरकारने खरीप हंगामातील धानासाठी मंजूर केलेले 600/- रुपये प्रोत्साहन राशी DBT च्या माध्यमातून शेतक-यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात यावे. धान विक्रीसाठी 7/12 ऑनलाईन करतेवेळी शेतकरी स्वतः हजर असल्याची अट शिथिल करण्यात यावी किंवा त्याऐवजी त्याचे वारदार उपस्थित असल्यास त्यांना मान्यता देण्यात यावी. शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. तसेच प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी. अतिवृष्टीने नुसान झालेली घरे, जनावरांची गोठे व शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्तांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात यावे. घरकुल प्रपत्र ‘ड’ मध्ये सुटलेली नावे समाविष्ट करण्यात यावीं व ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावा प्रमाणे मंजूरी प्रदान करण्यात यावी. नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर 50000/- रूपये त्वरीत देण्यात यावे. आमगांव कामठा मार्गासाठी 2 कोटी 13 लाख रूपयाचे काम न करता नोंद दाखवून अपूर्ण असलेल्या कामाची चौकशी करून काम त्वरीत सुरू करण्यात यावे. घरकूल योजनेची किंमत शहर विभागाप्रमाणे 2.5 लाख पर्यंत वाढविण्यात यावे. रोजगार हमी योजनेचा आराखडा त्वरीत तयार करून लोकांना त्वरीत कामे मिळावे यासाठी नियोजन करण्यात यावे. निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, अंध, अपंग यांचे थकित मासिक पेंशनचे पैसे त्वरीत खात्यांत जमा करण्यात यावे. शेतक-यांना 24 तास विद्युत उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच शेतक-यांच्या कृषी पंपाचे बिल माफ करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. तसेच 4 ते 5 महिन्यापासून थकीत मानधन मिळाले नाही तरी ते त्वरीत देण्यात यावे. शाळेतील मध्यान्ह भोजन बनवणा-या स्वयपाकीचे दैनंदिन रोजीत वाढ करण्यात यावी किंवा स्वयंपाकींना रोजगार हमी योजने अंतर्गत मजूरी देण्यात यावी या मागण्यांसह आमगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना तहसिलदार मार्फत उपरोक्त मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक तसेच हजारो च्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, श्री यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, केतन तुरकर, श्री कमलबापू बहेकार, डॉ अजय उमाटे,सौ. कविता रहांगडाले, टिकाराम मेंढे, राजेश भक्तवती, जियालाल पंघरे, सौ. सीमा शेंडे, सौ. शिला ब्राम्हणकर, सौ. कविता राहागडाले, सौ. जयश्री पुंडकर, लोकनाथ हरीणखेडे, शुभाष यावलकर, तुकडूजी रहामंडाले, रविंद्र मेश्राम, रवि क्षिरसागर, प्रमोद शिवनकर, भारत पागोटे, राजकुमार प्रतापगडे, सुमित कन्नमवार, बबलू बिसेन, पियुश झा, संतोष राहांगडाले, कमलेश बहेकार, नागदेव दोनोडे, सुनिल कुमार ब्राम्हणकर, हंसराज चुटे, टिकाराम भांडारकर, चुन्नीलालजी सहारे,अशोक कटरे, अजित बहेकार, किर्तीकुमार गौतम, प्रकाश पटले, अंकुश कारंजेकर, वासुदेव मडावी, अन्तोष रहांगडाले, लक्षमी येडे, लक्षमी भुते, रुपाली भक्तवर्ती, शोभा डोये, सुनीता सोनवाने, विमल सोनवाने, राधिका रहांगडाले, माधुरी मेश्राम, वंदना बिसेन, अनुकूल मडावी, गुणवंता तुरकर, गीता रहांगडाले, आरती कोटांगले, उषा हर्षे, दुर्गा मेहर, शिला चुटे, शोभा फुंडे, पुस्प बहेकार, संगीत हनवते, स्वाती सोनवाने, रिता ठाकरे, ललिता कटरे, अनिता ठाकरे, रिता पारधी, समरता सोनवाने, शेवंता सेवावाने, रीथा पारधी, कल्पना पारधी, माया सोनवाने, प्रमिला चकोले, योगिता सोनवाने, शांता शेंडे, कौतिका सोनवाने, भागरता ठाकरे, राघनबाई राऊत, देवांगना रहांगडाले, प्रमिला घोरमोडे, अंतकाला पंधरे, कौशल उईके, पंचफुला गाते, निर्मला गाते, खेलणं रहांगडाले, कांता उईके, भागरता पटले, शोभा पटले, दुर्गा ठाकरे, सुनीता गाते, भाग्यश्वरी गौतम, अंजु गौतम, लेखेश्वरी गौतम, प्रमिला गौतम, लक्ष्मी सोनवाने, उषा बहेकार, शेवंता फरकुंडे, पूनम कोसरे, दुर्गा ब्राह्मणकर, मधुकर पटले,योगराज शेंडे, बाबुलाल हेमाणे, रमण डेकाटे, विनोद कानम्मवार, सौरभ डोंगरे, भोजराज कटरे, बाबुराव ब्राह्मणकर, लेखन भलावी, हरिचंद रहांगडाले, जीवन चौधरी, गणपत पटले, लोकेश कटरे, हिरालाल उईके, संजू बोपचे, मुन्ना मेहर, अशोक कटरे, रवी सोनवाने, बंडू रहांगडाले, धनराज बोपचे, दुर्गा बिसेन, सीताराम बिसेन, मुन्नालाल पारधी, आत्माराम कंठाने, शालिकराम चुटे, देवराम बिसेन, कैलास रहांगडाले, नरेश बिसेन, अशोक पटले, राजेश मटाले, संजू डोये, स्वप्नील कावळे, यादवराव मेंढे, रामेश्वर सोनवाने, भोलागिरी महाराज, राजकुमार वाढइ, फागो ब्राह्मणकर, रघु थेर, किशोर बोलणे, बापू भांडारकर, हरिचंद मडावी, गणेश हर्षे, रमेश बिसेन, टेकचंद हरिणखेडे, देवराव बिसेन, तीर्थ येटरे, संजय रावत, महादेव हटवार, आशिष वैद्य, प्रकाश राऊत, अंकुश शिवणकर, तेजराम शेंडे, अनिल चोखंदरे, चुन्नीलाल मिश्रा, कांता रहिले, सारसता गायधने, गोपाळ रहिले, दिलीप महारवाडे, श्यामराव हुकरे, घनश्याम मेंढे, ताराचंद काटेखाये, लक्ष्मण थेर, भुमेश्वर शेंडे,रेखा शेंडे, उषा डोंगरे, गायत्री कटरे,बबन पटले, बाबूलाल बोपचे, मुलचंद बधेले, भुमेश्वरी बघेले, उषाबाई परिहार, पालीकराम दोनोडे, जितेंद्र पटले, रमेश भुते, सिंधु भुते, गिरीश पटले, उदेलाल गौतम, पुरुषोत्तम चुटे, विजय भांडारकर, सोनवणे मॅडम, भोजराज सोनवणे, महेंद्र राहांगडाले, वंदना बोरकर, निर्जला टेंभरे, अजय टेंभरे, रामचंद्र ठाकरे, मीना फुंडे, गणपत फुंडे, सेवकराम डोये, बाबूलाल वाढई, कमलेश मोटधरे, मुना पटले, नेनुजी बिसेन, निलेश नरेश गौतम, अशोक उके, लालचंद गिरीपुंजे, प्रवीण मेंढे, दुर्गाताई मेहर, अशा लक्षणे, मायाताई दुध बर्गे, सतीश चुटे, विनोद चुटे, उमेंद्र खोब्रागडे, सुरेंद्र कोटांगले, सहित या आंदोलनात मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक तसेच हजारो च्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.