
गोंदिया,दि.20ः- जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगांव तालुक्यातील नांगणडोह येथील आदिवासी समाजातील 10-12 कुटुबांना हत्तीच्या कळपाने घरांची व शेतीची नासधुस केल्याने दुसऱ्या गांवात आसरा घेण्याची वेळ आली आहे.शासनाच्यावतीने यांना मदत मिळायला पाहिजे ती अद्याप न मिळाल्याने संघर्ष वाहीनी व इतर संस्थाच्यावतीने 19 आँक्टोंबरला या गावात भेट घेत तेथील बाधितांना मदत देण्यात आली.नागणडोह या आदिवासी पाड्यावरील लोकसंख्या 55 असून त्यात 15 पुरुष, 14 महिला, 26 लहान मोठी मुले-मूलीचा समावेश आहे. डोंगर, जंगल, शेती अश्या नयनरम्य वातावरणात गोंडी संस्कृतिची एक वेगळी झलक. पाडयाला रस्ते नाही पण कसलीही कुरकुर नाही. मात्र आजबाजुच्या गांवांच्या जीवनाची छाप यांच्याही जीवनावर.गांवातील चहा टपरीवर एकच चर्चा, कळप इकडे गेला तिकडे गेला. तरीही जगणे सुरुच असते.
नागंणडोह आदिवासी पाडा. गोंदिया जिल्ह्याचे अखेरचे गांव. यानंतर गडचिरोली जिल्ह्या सुरु. खुप दिवसांपासून वर्तमानपत्रतुन चर्चा होती की हत्ती दुसऱ्या राज्यात हलवायचे म्हणून सरकारचा आदेश. त्या आदेशाला स्थगीती मिळावी म्हणून कुणीतरी पर्यावरणवादी कोर्टात. कोर्टाची सरकारच्या आदेशाला स्थागीती. त्यामुळे हत्तीचा इथला मुक्काम वाढल्याचे बोलले जात आहे. नागपूर येथील संघर्ष वाहिनी व इतर संस्थेच्या चमूतील विलास भोंगाडे, दीनानाथ वाघमारे, समीक्षा गनवीर, मनीषा शहारे, अल्का मडावी आदींनी या पाडयाला भेट दिली.अल्का मडावी यांनी धान्याचा पुरवठा केले.तर समितीच्यावतीने साड्या, मुला-मुलींचे कपड़े देण्यात आले असून वन विभागाकडूनही मदत पोहचवीली जात आहे.