मतदार नोंदणी जनजागृतीसाठी सायकल रॅली

0
26

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

  गोंदिया दि. 0701 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित झाला असून 09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) रोजी गोंदिया जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत दिनांक 09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) रोजी मतदान जागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यांत आले असून सदर रॅली प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक, गोंदिया येथून सकाळी 9 वाजता निघणार आहे.

 सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 19 (शनिवार) व 20 (रविवार) नोव्हेंबर, 2022 आणि  03 (शनिवार) व 04 (रविवार) डिसेंबर, 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सबब संबंधित विशेष मोहिम अंतर्गत 18-19 वयोगटातील मतदार, तृतीय पंथीय, देह व्यवसाय करणा-या स्त्रिया आणि दिव्यांग मतदार यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. याकरिता आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉगीन करुन आपले नांव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावे.

          मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता 10 नोव्हेंबर, 2022 (गुरुवार) रोजी गोंदिया जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसेभेचे आयोजन करण्यात येणार असून  09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) रोजी प्रसिध्द करण्यांत आलेल्या प्रारुप मतदार यादीचे वाचन सदर विशेष ग्राम सभेत होणार आहे. त्यानुसार मतदान यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती, रहिवाशाचे स्थालांतरण विधानसभा अंतर्गत / बाहेरिल, मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी करण्याकरिता नमुना 6-ब भरुन संबंधीत आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल  या पोर्टलवर लॉगीन करुन संबंधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहिम / विशेष ग्राम सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.