इडब्ल्यूएस आरक्षण भारतीय संविधानाच्या मूलभूत गाभ्याच्या विरोधात-डॉ.ज्ञानेश्वर गोरे

0
25

यवतमाळ,दि.13ः-समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,सामाजिक न्याय या चतुसूत्रीवर भारतीय संविधानाने भारतातील ओबीसी,एससी,एसटी या बांधवांना आरक्षण दिले.या प्रक्रियेमध्ये आर्थिक निकष कुठेच बसत नव्हते.परंतु सुदामा आरक्षण सुप्रीम कोर्टाने देऊन भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद दिल्याचे मत डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी व्यक्त केले.ते यवतमाळ येथे आयोजित सभेत बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब गावंडे यांनी सुद्धा आरक्षणाची भूमिका आता बदलत चाललेली आहे.आपण सर्व ओबीसी,एससी,एसटी,बांधवांनी जागृत होऊन त्याचा विरोध केला पाहिजे.आणि सामाजिक न्यायाची लढाई गतिमान केली पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी सुनीता काळे, प्रा.सुनंदा वालदे,एम.के.कोडापे,सविता हजारे,अंकुश वाकडे यांनीही सामाजिक समतेकरीता आपण सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजे असे विचार मांडले.आरक्षण विरोधी नितीच्या विरोधात बंड पुकारले पाहिजे.आपल्या विचाराचे सरकार या देशात आणलं पाहिजे,अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.यावेळी रमेश नाखले. पंडित दिघाडे,रविद्र गुल्हाने,विजय मालखेडे,सुभाष मनवर ,केशव बोरकर,धनराज धवणे,प्रशांत कुबडे,राहुल पाचघरे,संदीप कोरडे,इंजि.अरुणकुमार सांगळे,विलास काळे,अशोक मोहूरले,बाळकृष्ण गेडाम,राजाभाऊ ठाकरे,डॉ.भीमराव गणवीर,राजकुमार उंमरे,शालिनी कांबळे,एम.के.कोडापे,मायाताई गोरे,माधुरी फेडर,नीताताई दरणे,कमलताई खंडारे,उषाताई सोनटक्के,सिंधुताई धवणे,उषाताई खडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ज्योती सावित्री वंदनेने झाली.तर समारोप भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने झाले. सूत्रसंचालन विलास काळे यांनी केले आभार प्रदर्शन अशोक मोहुरले यांनी केले.