गार्डनमधील पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू

0
39
गोंदिया- नवेगांवबांध राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलातील हिल टॉप गार्डन मधल्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षे बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सफल होमानंद नंदनवार रा. अर्जुनीमोर असे मृत बालकाचे नाव आहे.शहरातील स्नेहा नंदनवार व त्यांचा चार वर्षीय मुलगा सफल व इतर आठ ते नऊ महिला या नवेगाव बांध अभयारण्य व पर्यटन स्थळी मंगळवारी आले होते. पर्यटनास आलेल्या सर्वानी डबा भोजन केला.दरम्यान लहान-लहान मुले गार्डन मधे खेळत असतानाच सफल हा गार्डन मधील पाणी टाक्यात पडला. याची माहीती सफल सोबत खेळत असलेल्या लहान मुलांनी त्याच्या आईला दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून तात्काळ सफलला पाणी टाक्यामधून बाहेर काढून नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सफलला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सफलचे वडील होमानंद नंदनवार हे तातडीने अर्जुनीवरून नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात आले. त्यानंतर सर्व घटनेची माहीती घेवून मुलगा सफल याचा मृतदेह सो बत घेवून गेले. एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने नंदनवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.