धान खरेदी केंद्र संस्थेच्या हितासाठी नव्हे तर शेतकरीहितासाठी-ड़ीएमओ मनोज बाजपेयी

0
44

गोंदिया,दि.17ः जिल्ह्यात केंद्रसरकारच्या हमीभाव योजनेतंर्गत आधारभूत किमतीवर धान खरेदी केंद्राना मंजुरी मिळाली असून धान खरेदी करणार्या संस्थानी आपण शेतकरी हितासाठी काम करतोय ही भावना ठेवून खरेदी करताना पारदर्शकपणे काम करावे अशा सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपेयी यांनी दिल्या.सोबतच धान खरेदी ही आफलाईन नसून आनलाईन आहे.याप्रकियेतील सर्वच गोष्टी आँनलाईन असल्याने कुणीही आॅफलाईन काम करु नये. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील धान खरेदी संस्था,ग्रेडर,संचालक व संगणक आॅफरेटर यांच्या बैठकीत ते आज 17 नोव्हेंबरला बोलत होते.यावर्षी ४० क्विटंल प्रती हेक्टरी धान खरेदी करण्यात येणार आहे.गेल्या वर्षभरात ज्या काही समस्या समोर आल्या ,काही गोष्टी घडल्या,त्या पुन्हा घडू नये याकरीता सर्वांनी कागदोपत्री कामकाज व्यवस्थित करणे आवश्यक असल्याचे सागंत धान खरेदी केंद्र हे संस्थासाठी चालवले जातेय हा संभ्रम दूर करुन हे केंद्र शेतकरी वर्गाकरीता आहे,हे स्विकारणे आवश्यक आहे,असेही बाजपेयी म्हणाले.संस्थाना केंद्रावर धान खरेदी करतांना काही शेतकरी,राजकीय व्यक्ती व इतरांच्या दबावामुळे काही काम करताना चुका होतात,त्या चूका टाळण्यासाठी शासन नियमाप्रमाणे काम केल्यास कुणीही संस्थावर दबाव आणणार नसल्याचे सांगितले.
चालू हंगामात धान खरेदी करताना संस्थाचालकांनी कर्मचारीवर्ग,ग्रेडर व इतर कर्मचारी यांचे संस्थेच्या ठरावावर लेखी घ्यावे तसेच त्यांच्यासोबत करारपत्र करुन घ्यावे आणि धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनसोबतचे करारनामे त्वरीत सुरु करावे अशा सचुना केल्या. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व धान खरेदी संस्थाचे संचालक,ग्रेडर,केंद्रप्रमुख,व्यवस्थापक व सगंणक आॅफरेटर उपस्थित होते.