गोरेगाव,दि.19ः- तालुक्यातील गोवारीटोला तालुका गोरेगाव येथे समर्थ सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी राजेंद्र जैन यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी वर्ग यांच्या कडुन केंद्रावरील वजनांचे पुजन करुन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. खरीप हंगाम 2022- 23 मधील धान खरेदी केंद्र दिवाळी संपल्यानंतरही सुरू न झाल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले होते. खा. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे धान खरेदी सुरू झाल्याने शेतकर्यांनी खा. प्रफुल पटेल व माजी आमदार जैन यांचे आभार मानले.
माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, शासकीय आधारभूत धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी आपण शेतकरी हितासाठी काम करतोय हि भावना ठेवून खरेदी करतांना पारदर्शक पणे काम करावे. अनेक धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा अभाव असून जिल्हा पणन अधिकारी यांनी तत्परतेने धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून द्यावा.
उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री देवेंद्रनाथ चौबे, डी. यू. रहांगडाले, सी. डी. मेंढे, चौकलाल येडे, भास्कर काटेवार, बाबा बहेकार, भाऊलाल बिसेन, ओमकार कटरे, दिगंबर रहांगडाले, खेमराज रहांगडाले, गणराज कुंभळे, आवलाराम हरिणखेडे, चंद्रभान साखरे, धनराज शिवणकर, धनराज येडे, तीर्थानंद नाईक, नरेश कोहळे, नितीश टेभऱे, रुपचंद रहांगडाले, हेमराज रहांगडाले, देवीलाल भोयर, चोपलाल पटले, यशलाल पटले, सदाशिव पटले, चंद्रनाथ वलथरे, दयानंद हरिणखेडे, चंद्रसेन रहांगडाले, देवचंद रहांगडाले, योगराज मेश्राम, छत्रपाल रहांगडाले, देवराम बिसेन, शंकर बिसेन, इशुलाल औरासे, उमेश बोपचे, मुकेश गौतम, दिलीपभाऊ कटरे, गुणेश्वर कटरे, इंद्रराज राऊत, ब्रिजलाल औरासे, डॉ श्याम फाये, बिनाराम रहांगडाले, प्रेमलाल माळकाम, युवराज पटले, भोजराज पटले, देवेंद्र गौतम, मेधश्याम मेंढे, राजकुमार रहांगडाले, जियालाल चौधरी, राजूजी चौहान, सतीश रहांगडाले, राहुल औरासे, तोषराम औरासे, राधेश्याम पटले, जितेंद्र पटले, मुनेश्वर बिसेन, पृथ्वीराज रहांगडाले, निळेश्वर औरासे, चंदुलाल ताराम, विठ्ठल भंडारी, तातूलाल पटले, शिवचरण नाईक, संतोष कुंभरे, कुवरलाल पटले, रामराज पटले, प्रीतिपाल पटले, अशोक वट्टी, फगलाल रहांगडाले,डिगराज रहांगडाले, पुरुशोत्तम बिसेन, टेमचंद पटले, डुळेश्वर पटले, दयाप्रसाद रहांगडाले, विजय बागडे, चुन्नीलाल औरासे, तुकाराम पटले सहित संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते.