गोंदिया : गोंदिया जिल्हा सबज्युनियर कबड्डी खेळाडूंची निवड चाचणी १५ नोव्हेंबर रोजी संत गाडगेबाबा क्रिडा मंडळ सूर्याटोला येथे घेण्यात आली. यात १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव एस.ए. वहाब यांच्यावतीने गोंदिया जिल्हा सबज्युनियर कबड्डी खेळाडूंची निवड चाचणी संत गाडगेबाबा क्रिडा मंडळ सूर्याटोला येथे आयोजित करण्यात आली होती. यात १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सदर खेळाडू भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे २, ३ व ४ डिसेंबर रोजी होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यावेळी गोंदिया जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव एस.ए. वहाब, राष्टÑवादी काँग्रेसचे निशिकांत बन्सोड, पंकज बोरकर, भुरू धोटे, जीतू चौधरी, महेंद्र अहाके, सुनील नेवारे, शुभम गाते आदी उपस्थित होते.