
गोंदिया,दि.23ः- सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत दिव्यांग मुलांच्या आरोग्य, शिक्षण व पुनर्वसनासाठी काम करीत असताना जास्त मेहनत घ्यावी लागते. हे करत असताना जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की एकही दिव्यांग विदयार्थी त्याला लागणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. असे प्रतिपादन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ महेन्द्र गजभिये यांनी व्यक्त केले.
ते समग्र शिक्षाच्या दिव्यांग विभागातील तालुका समन्वयक व रीसोर्स टीचर यांच्या आढावा सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.दिनांक 22 रोजी समग्र शिक्षा अभियान च्या दिव्यांग विभात कार्यरत कर्मचाऱ्यांची आढावा सभा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी याचे सह जिल्हा समन्वयक विजय ठोकणे व विलास मलवार उपस्थीत होते.
शिक्षकांना मार्गदर्शन करून दिव्यांग मुलांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा केंद्रं निहाय आढावा यावेळी डॉ महेन्द्र गजभिये यांनी घेतला. विशेषत UDID कार्ड करीता नोंदणी करून लवकरात लवकर कार्ड मुलांना कसे मिळेल यावर चर्चा घडून आणली. विद्यार्थांना देण्यात येणारे विवीध साहित्य व अंध मुलांची पुस्तके याचा वापर मुलांनी करावा यासाठी शिक्षक व पालक भेटी घेण्याच्या सूचनाही दिल्या.
शिक्षणाधिकारी डॉ महेन्द्र गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली विभागाची प्रथम सभा असल्याने तालुक्यांतील समावेशीत शिक्षणं तज्ञ व रिसोर्स टीचर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेला जिल्ह्याचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, तालुका समन्वयक थानसिंह बघेले, गजानन धावडे, योगेश कापगते, प्रदिप वालदे, अमोल डोंगरदिवे, जगदीश राणे, महानंद डोंगरे यांच्या सह जिल्हयातील सर्व रिसोर्स टीचर उपस्थीत होते.