
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा सुरू
बुऱ्हानपूर I मध्यप्रदेश-
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातून सुरू झाली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील जळगाव जामोद येथून सकाळी 6 वाजता निघून बुऱ्हानपूर जिल्ह्यातील बोदर्ली गावात सकाळी 7 वाजता पोहोचली. गाडीतून खाली उतरताच राहुलचे जंगी स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांचे महिलांनी औक्षण केले.
त्यांच्या स्वागतासाठी बंजारा लोकनृत्य कलाकार रीना नरेंद्र पवार यांनी सादर केले. राहुल यांनी 11 मिनिटांचे भाषण केले. तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, या यात्रेला मध्यप्रदेशात जास्तीत जास्त जनतेचा पाठिंबा मिळणार आहे.
बाबा साहेब का आशीर्वाद, लोक नृत्य के रंग और मध्यप्रदेश की उत्साही जनता…प्रवेश के साथ ही #BharatJodoYatra ने हिंदुस्तान के 'दिल' में जगह बना ली है। pic.twitter.com/er0jErDwtH
— Indian Youth Congress (@IYC) November 23, 2022
राहुल गांधी यांची यात्रा सकाळी 10 वाजता बुऱ्हानपूर येथील सेंट झेवियर्स शाळेत पोहोचेल. यादरम्यान राहुल गांधी 7 किमी चालणार आहेत. बुरहानपूरपासून यात्रा 10 किमी अंतरावर आहे. बुरहानपूर येथे दुपारी 4 वाजता प्रवास पुन्हा सुरू होईल. सायंकाळी 7 वाजता परिवहन नगर येथे सभा होणार आहे. बैठकीनंतर राहुल गांधी झिरीमध्ये रात्रीचा मुक्काम करणार आहेत.
राहुल गांधी बोदर्लीमध्ये काय म्हणाले
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही कन्याकुमारीमध्ये हा प्रवास सुरू केला. आम्ही सुरुवात केली तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणाले होते की भारत 3600 किमी लांब आहे. हे पायी करता येत नाही. आम्ही मध्य प्रदेशात आलो आहोत. येथे 370 किमी चालणार आहोत. हा तिरंगा आम्ही श्रीनगरमध्ये फडकवू. ते कोणीही रोखू शकत नाही. हा तिरंगा श्रीनगरला जाणार आहे. प्रवासाच्या मागे 3 गोल आहेत. सर्वप्रथम, भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा आणि भीतीविरुद्ध हा मोर्चा आहे.
सर्वप्रथम भाजपने भीती पसरवली. कोणाच्या मनात भीती आहे ? तरुणांच्या मनात भीती. बेकारी कशी वाढली. शेतकऱ्यांच्या मनात भीती. कसे – योग्य किंमत न देऊन. विम्याचे पैसे न भरून, कर्जमाफी न केल्याने. कामगारांच्या मनात भीती. मनरेगाचे पैसे न दिल्याने. प्रथम त्यांनी भीती पसरवली. ही भीती पसरली की, त्याचे हिसेत रूपांतर होते. आम्हाला असा भारत नको आहे, जिथे भाजप भीती, द्वेष, हिंसाचार पसरवत आहे. आम्ही सद्या तोंड बंद केले आहे. पण डोळ्याने सर्व पाहत आहोत.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भारतात तीन-चार अब्जाधीश जे काही स्वप्न पाहतात, ते पूर्ण करू शकतात. कारण त्यांच्या हातात संपूर्ण सरकार आहे. त्यांच्या हातात उद्योग आहेत. विमानतळ, कंपनी, रेल्वे सर्व त्यांच्या हाती आहे. मात्र, आम्हाला असा भारत नको आहे. गरीबांना न्याय देणारा भारत आम्हाला पाहीजे आहे, लोकांकडे हात करित राहुल गांधी यांनी आवाहन केले की, हे सर्व तुम्ही ठरवू शकता.
वाह मध्यप्रदेश… कमाल कर दिया आपने।#BharatJodoYatra के स्वागत में सड़कों पर दिल खोलकर उतरा है भारत का 'दिल' pic.twitter.com/RDhYn4wt8l
— Indian Youth Congress (@IYC) November 23, 2022
लोककलावंताशी साधला संवाद
राहुल गांधी यांनी लोककलाकार रीना पवार यांनाही प्रश्न केला. विचारले- यूपीए सत्तेत असताना सिलिंडरचे दर काय होते. नंतर 400 आणि आता बाराशे रुपये झाले. आज पेट्रोलचा दर 100-150 रुपये आहे. पूर्वी ते 50 रुपये होते. हा पैसा जातो कुठे? हा पैसा तीन-चार उद्योगपतींच्या खिशात जात आहे. आपले तोंड बंद ठेवा आणि आपले कान उघडे ठेवा. मी माझ्या मनाचे ऐकत नाही, मी तुझ्या मनाचे ऐकतो. शेतकरी, तरुण, व्यापारी यांचे विचार ऐकतो. दिवसभर चालतो. या यात्रेतून लोकांशी संवाद साधत आहे.
चली रे चली, जम के चली भारत जोड़ो यात्रा ..#BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/ZLhgSPhnDr
— Indian Youth Congress (@IYC) November 23, 2022