तुमसर*न.प. अंतर्गत येत असलेली नेहरू शाळा न.प. तुमसर, या शाळेत मागील काही महिन्यापुर्वी चोरी झाली असता त्यात खेळाची संपुर्ण सामग्री चोरीला गेली होती व ती नंतर मिळाली नाही. त्यामुळे सध्या शाळेत खेळाची सामग्री नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना सराव करण्यास त्रास होत आहे. मुलांकडून वारंवार मागणी करुन सुध्दा शाळेतील मुख्याध्यापक यावर दुर्लक्ष करीत होते. व आता येणा-या 2 डिसेंबर 2022 ला मुलांचे शालेय क्रिकेट टुर्नामेंट असुन त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही.
आपल्या मागणीकडे कोणीही लक्ष न देत असल्याचे लक्षात येताच शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमुद्रा ग्रुप संस्थापक अध्यक्ष इंजि. सागर गभने यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याची माहिती दिली त्यावर त्यांनी मुलांच्या हिताचे विचार करुन त्यांना पुरेशी क्रिकेट खेळाची साम्रगी लवकरात लवकर उपलब्ध करुन देता यावी यासाठी न. प. मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम सर यांच्याशी संपर्क साधला व त्यांना निवेदन देत मागणी केली की लवकरात लवकर खेळाडूंना सामग्री उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मुलाना येणारा टूर्नामेंट मध्ये सहभागी होता येईल. यावेळी राहुल रणदिवे, संकेत गजबिये, हितेश मेहर उपस्थित होते.





