
अमरावती,दि.23.-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक दि. 22 नोव्हेंबर रोजी 63 मतदान केंद्रांवर संपन्न झाली. या निवडणूकीची मतमोजणी दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजतापासून विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानरुाोत केंद्र येथे सुरु झाली असून आज दुपारी 3.00 वाजेपर्यंतचे निकाल जाहीर झाले आहेत.
अधिसभेसाठी दहा प्राचार्य मतदारसंघातून अनुसूचित जाती वर्गवारीत एका जागेसाठी डॉ. सुभाष गवई यांना 65, तर डॉ. राजेंद्र रामटेके यांना 49 मते मिळाली असून डॉ. सुभाष गवई विजयी झालेत. डी.टी./एन.टी. वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. राजेश चंदनपाट यांना 40, तर डॉ. विजय नागरे यांना 74 मते मिळाली असून डॉ. विजय नागरे विजयी झालेत. ओबीसी वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. उध्दव जाणे यांना 43, तर डॉ. अंबादास कुलट यांना 73 मते मिळाली असून डॉ. अंबादास कुलट विजयी झालेत. महिला वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. मिनल ठाकरे यांना 51, तर डॉ. आराधना वैद्य यांना 64 मते मिळाली असून डॉ. आराधना वैद्य विजयी झाल्यात, तर सर्वसाधारण वर्गवारीत पाच जागांसाठी डॉ. राधेश्याम सिकची, डॉ. देवेंद्र गावंडे, डॉ. सुनिल पांडे, डॉ. संजय खेरडे व डॉ. निलेश गावंडे विजयी झालेत.
सहा व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघाच्या महिला वर्गवारीत एका जागेसाठी डॉ. मिनल गावंडे यांना 133, तर डॉ. विरा मांडवकर यांना 78 मते मिळाली असून डॉ. मिनल गावंडे विजयी झाल्यात. सर्वसाधारण वर्गवारीत 4 जागांसाठी श्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. अशोक चव्हाण, श्री राम देवसरकर व अॅड. मोतीसिंह मोहता विजयी झालेत.
महाविद्यालयीन दहा शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. प्रफुल्ल गवई यांना 1006, डॉ. रविंद्र मुंद्रे यांना 1581, तर डॉ. प्रकाश पानतावणे यांना 318 मते मिळाली असून डॉ. रविंद्र मुंद्रे विजयी झालेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रा. हरीदास धुर्वे यांना 1868, तर प्रा. प्रसाद मडावी यांना 1011 मते मिळाली असून प्रा. हरिदास धुर्वे विजयी झालेत. डी.टी./एन.टी. वर्गवारीतून प्रा. निता गिरी यांना 1113, तर प्रा. विजय कापसे यांना 1833 मते मिळाली असून प्रा. विजय कापसे विजयी झालेत. ओबीसी वर्गवारीतून डॉ. सुभाष गावंडे यांना 1828, तर डॉ. प्रदीप खेडकर यांना 1087 मते मिळाली असून डॉ. सुभाष गावंडे विजयी झालेत. महिला वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. अर्चना बोबडे यांना 2029, तर डॉ. रेखा मग्गीरवार यांना 930 मते मिळाली असून डॉ. अर्चना बोबडे विजयी झाल्यात.
तीन विद्यापीठ शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी महिला वर्गवारीतून सौ. जागृती बारब्दे यांना 35, तर कु. वैशाली धनविजय यांना 22 मते मिळाली असून सौ. जागृती बारब्दे ह्रा विजयी झाल्यात. सर्वसाधारण वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. अनिल नाईक यांना 24, तर डॉ. संदीप वाघुळे यांना 33 मते मिळाली असून डॉ. संदीप वाघुळे विजयी झालेत.
दहा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून महिला वर्गवारीतील एका जागेसाठी अनुराधा जळीत यांना 4434, तर मयुरी जवंजाळ यांना 5785 मते मिळाली असून मयुरी जवंजाळ विजयी झाल्यात. या मतदार संघातील इतर वर्गवारीतील निकालाची प्रक्रिया सुरु असून लवकरच निकाल घोषित होतील.
अभ्यास मंडळाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत संलग्नित महाविद्यालयातील गणित मंडळ निवडणुकीत डॉ. विजय मेटे, डॉ. अनिल निमकर व डॉ. विद्या शर्मा, भौतिकशास्त्र मंडळात डॉ. गोपाल ढोकणे, डॉ. अजय लाड व डॉ. संजयकुमार शामकुंवर, रसायनशास्त्र अभ्यास मंडळात डॉ. सुमरसिंह ठाकूर, डॉ. हेमंतकुमार चांडक व डॉ. प्रवीण रघुवंशी, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. दिलीप हांडे, डॉ. सुचिता खोडके व डॉ. तुषार वानखडे, विज्ञान (इंग्रजी व भारतीय भाषा) अभ्यास मंडळावर डॉ. अभिजित अणे, डॉ. विजय जाधव व डॉ. अविनाश थोटे, इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ. अजय ठाकरे व डॉ. मनिष तिबडेवाल निवडून आलेत, तर फार्मास्युटीकल सायन्स अभ्यास मंडळावर डॉ. अनिल चांदेवार, डॉ. सचिन दिघडे व डॉ. शिरिष जैन निवडल्या गेलेत.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत लेखा व सांख्यिकी अभ्यास मंडळावर डॉ. मनोजकुमार जगताप, डॉ. मनोज पिंपळे व डॉ. सोनल चांडक, व्यवसाय व्यवस्थापन अभ्यास मंडळावर डॉ. रुपेश कुहेकर, डॉ. आनंद नारंजे व डॉ. प्रसाद खानझोडे, वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. ताराचंद कंटाळे व डॉ. सुभाष राऊत निवडून आलेत.
मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत इंग्रजी अभ्यास मंडळावर डॉ. राजेश मस्के, डॉ. सुधीर त्रिकांडे व डॉ. किरण खंडारे निवडून आलेत. मराठी अभ्यास मंडळावर डॉ. काशिनाथ ब-हाटे, डॉ. गजानन मुंढे व डॉ. अण्णा वैद्य, इतिहास अभ्यास मंडळावर डॉ. संतोष बनसोड, डॉ. गोविंद तिरमनवार व डॉ. कैलास गायकवाड, अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. रामदास भांडवळकर, डॉ. मधुकर ताकतोडे डॉ.एस.एम. दंडाडे, राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. प्रशांत विघे, डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी व डॉ. सुभाष गवई विजयी झालेत, तर होम इकॉनॉमिक्स अभ्यास मंडळावर डॉ. संध्या काळे, डॉ. कल्पना कोरडे व डॉ. निना चावरे निवडून आल्यात.
विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्वसाधारण वर्गवारीतून एका जागेसाठी डॉ. संजीव जगताप यांना 1715, तर डॉ. दिनेश खेडकर यांना 1175 मते मिळाली असून डॉ. संजीव जगताप विजयी झालेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील अनुसूचित जाती वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. वर्षा सुखदेवे यांना 2005, तर डॉ. अरुणा वाडेकर यांना 1025 मते मिळाली असून डॉ. वर्षा सुखदेवे ह्रा विजयी झाल्यात. सर्वसाधारण वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. ए.जी. हरणे यांना 1215, तर डॉ. एम.एम. पिंपळे यांना 1669 मते मिळाली असून डॉ.एम.एम. पिंपळे विजयी झालेत. मानवविज्ञान विद्याशाखेतील डी.टी. / एन.टी. वर्गवारीत डॉ. अरुण चव्हाण यांना 1339, तर डॉ. जीवन पवार यांना 1500 मते मिळाली असून डॉ. जीवन पवार निवडून आलेत. सर्वसाधारण वर्गवारीतून डॉ. सुनिल आखरे यांना 1244, तर डॉ. नितीन चांगोले यांना 1653 मते मिळाली असून डॉ. नितीन चांगोले विजयी झालेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील ओ.बी.सी. वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉ. एस.व्ही. देशमुख व डॉ. संजीव साळीवकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामधून डॉ.एस.व्ही. देशमुख यांचा विजय झाला.
मतमोजणीच्या कामासाठी शिक्षण विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले होते. त्या समितीत बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. यादवकुमार मावळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रणव कोलते, केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ.ए.एल. राठोड यांचा समावेश होता. निर्वाचन अधिकारी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी उत्कृष्टरितीने कार्य केले. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे विशेष मार्गदर्शन मतमोजणीच्या कामासाठी लाभले असून निवडणूक कक्षाचे उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव श्री रविंद्र सयाम, प्रभारी अधीक्षक श्री उमेश लांडगे यांचेसह विद्यापीठातील सर्व प्रमुख, अधिकारी तसेच कर्मचायांनी मतमोजणीच्या कामामध्ये सहभाग नोंदविला. अतिशय शांततेत मतमोजणीचे कार्य पार पडले असून अचूकपणे निकाल लागले.
10 नोंदणीकृत मतदारसंघामध्ये उर्वरीत जागांसाठी मतमोजणीची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे.