
तुमसर,दि.23ः- भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारा एकमेव नेतृत्व म्हणजे खासदार प्रफुल पटेल हे सर्वश्रुत आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक व क्षेत्राच्या भौतिक विकासा मध्ये खासदार पटेल यांचा सिहाचा वाटा आहे. आज विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडले गेलेले नागरी क्षेत्र असो की ग्रामीण क्षेत्र या ठिकाणी विकासाची कामे जी करण्यात आली त्यात कुठे ना कुठे पटेल यांचा सहभाग आहे, हे खुद्द विरोधक देखील मान्य करतात. खासदार पटेल यांनी सर्वसामान्य जनतेची नाळ तोडली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी देखील सर्व सामान्याच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे. पक्ष बळकटीच्या दुष्टीकोनातून सकारात्मक भावनेतून कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करावा. ज्या प्रमाणे आमचे नेते खासदार पटेल हे सर्व सामान्यांच्या पाठीशी उभे राहतात त्याच प्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
आज तुमसर शहरातील 8,9,10,11,12 या प्रभागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक दीनानाथ मंगल कार्यालय, लोटन पोहा मिल रोड तुमसर येथे राजेंद्र जैन,मधुकर कुकडे, देवचंद ठाकरे,रामदयाल पारधी,अभिशेख कारेमोरे,धनेंद्र तुरकर,योगेश सिंगनजुडे,राजेश देशमुख, प्रिती शेंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या सभेला सर्वश्री राजेंद्र जैन, मधुकर कुकडे, देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, अभिशेख कारेमोरे, धनेंद्र तुरकर, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, राकेश धार्मिक, प्रिती शेंडे, महेश गायधने, संदीप पेठे, अमर राजपाल, सुरेश माधवानी, दिनेश जवरानी, अग्रवालजी, पी. के. निखाडे, विनोद मानापुरे, अमर राजपाल, विक्रम फुलबांधे, राधेश्याम अलामकर, वामन टिचकुले, वसंत हटवार, प्रदीप भरणेकर, विक्रम लांजेवार, खेमू गाभने, सुमित मलेवार,प्रदीप भरणेकर, प्रतिक निखाडे, रोहित बिसने, नेहा मोटघरे, मीना गाढवे, नंदा डोरले, विजया चोपकर, वंदना आखरे, तोशल बुरडे, राकेश धार्मिक, हर्षल मलेवार, सुरज रुंधे, अमित कुरजेकर सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.