-विविध सांस्कृतिक कार्यक्रम
गोंदिया,दि.12ः- आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदिया च्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात ११ डिसेबंरला सकाळी ११वाजता साईमंगलम् लाॅन येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात होऊन शोभायात्रा श्री संताजी चौक शास्त्री वार्ड-मनोहर चौक-जयस्तंभ चौक – गांधी चौक – गोरेलाल चौक – नेहरू चौक – इंगळे चौक – मामा चौक व साईमंदिर मार्गे साईमंगलम् लाॅन येथे समारोप झाले. यानंतर जयंती कार्यक्रमानिमित्त संताजींच्या आदर्श तैलचित्राच पुजा पाठ करून त्यांच्या नावाचा गजर सौ. स्नेहलश्री संजय साठवणे यांच्या सुमधुर दिप गिताने सुरुवात झाली.
यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम – गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, नृत्य स्पर्धा,गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, फैन्सी ड्रेस, रांगोळी स्पर्धा, उप वधुवर परिचय मेळावा, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाचे अध्यक्ष वासुदेव वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली,
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या हस्ते झाले.तर दिप प्रज्वलन उद्योगपती शिलाताई धोटे यांच्या हस्ते झाले.विशेष अतिथी म्हणून उमेंद्र भेलावे,सुनिल लांजेवार,बाबुराव पडोळे,माधुरी नासरे,आशाताई पाटील,भरत वाघमारे,भारत पाटिल,विजु बावनकर,लखन धावडे,कमल भोंगाडे,पुष्पकुमार गंगभोईर,भैय्यालाल चांदेवार,डॉ.नरेश मोहरीर,डॉ अमोल धुर्वे,डाॅ अविनाश येळणे,मुकुंद धुर्वे,संतोष भेलावे,कमल कापसे,मुकेश पाटील,हरिराम येळणे सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
संताजींच्या आदर्श विचारांना तेवत ठेवून जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी लहान मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. चित्रकला- रांगोळी स्पर्धेत सहभागी समाज घटकांचे स्वागत करण्यात आले. महिलांना प्रश्न मंजुषा स्पर्धा- फैन्सी ड्रेस वेशभूषा स्पर्धेत प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. उपवधु- वर परिचय मेळाव्यात तरुण – तरुणींना परिचय दिला.मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.मनोगतात मा चरणभाऊ वाघमारे यांनी समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लहान मुलांचे उत्साह वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत अशा प्रकारे आपल्या मार्गदर्शनात समाजबांधवांना सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल.एफ. गिर्हेपुंजे,किष्णा कापसे,कैलाश भेलावे,लोकचंद डोनेकर,भक्तराज भेलावे,मिलिंद समरित,मनोज साकुरे,विजय सुपारे,राजू भेलावे,शामलाल कुंभलकर,दिनेश गायधने,शेषराज आकरे,सतिश वंजारी,भरत पाटील,प्रमोद बडवाईक,वसंत निखाडे,सुनिल भोंगाडे,अशोक पडोळे,मनोहर कापसे,टि.के.बावनकर,कमल हटवार,सचिन पाटील,दिलीप नवघरे,मारकंड गिर्हेपुंजे,माधव भेलावे,अभिमान तराळे,गोपाळराव कापसे,साहेबलाल साठवणे,हरिष तुळसकर,कुणाल वंजारी,गौरव बिसेन सह अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश गायधने,माधुरी नासरे,माधुरी भेलावे यांनी केले तर प्रास्ताविक कमल हटवार व आभार बालकृष्ण बालपांडे यांनी मानले.




