वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

0
22

गडचिरोली-जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. पोर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात ही घटना घडली असून ताराबाई लोनबले (७०, रा.जेप्रा) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज वन – विभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात येत असलेल्या दिबना गावालगतच्या जंगलात ताराबाई सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या परिसरात ‘टी-६’ वाघिणीचा वावर असून हा हल्ला तिनेच केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.