
समन्वयातून गावाचा सर्वांगिक विकास साध्य करावा – माजी आमदार राजेंद्र जैन
तिरोडा,दि.२४:: प्रत्येक गावपातळीवर काम करत असताना अनेक अडचणी येतात. परंतु, सरपंच – सदस्य यांनी आपसात समन्वयातून गावाचा सर्वांगिक विकास साधून विकासाकडे वाटचाल करावी असे आवाहन माजी आमदार श्री राजेंद्र जैन केले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमेकांना समजून घेऊन गावात विविध विकास योजना राबवाव्यात व गाव कसे समृद्ध करता येईल त्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करता येईल याकडे लक्ष देऊन पुढील निवडणुकांमध्ये आपला उमेदवार निवडून येईल यादृष्टीने वाटचाल करावी असे सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले.
तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कुंभारे लॉनं येथे तालुक्यातील ग्रामपंचायत च्या नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थित सरपंच व सदस्यांनी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल माजी आमदार श्री राजेंद्र जैन, यांच्या हस्ते व डॉ अविनाश जायसवाल, श्री नरेश कुंभारे, श्री अजय गौर, श्री जिब्राईल पठान, श्री राजेश गुणेरिया, सौ.राजलक्ष्मी तुरकर, श्री रविकांत बोपचे, श्री प्रेमकुमार रहांगडाले, श्री योगेंद्र भगत, श्री मनोज डोंगरे, श्री कैलास पटले, श्री जगदीश बावणथळे, श्री किरण पारधी, सौ.नीता रहांगडाले, श्री वाय.टी.कटरे, सौ.जया धावडे, सौ.सविता पटले, संध्या गजभिये, डॉ संदीप मेश्राम, सौ.रिता पटले, श्री बोधानंद गुरुजी,हेमराज अंबुले, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी जनतेचे आभार मानले. याप्रसंगी तिरोडा तालुक्यातील सुकळी/डाक ग्रामपंचायत – सुनिल मेश्राम सरपंच व सदस्य, बिहरीया ग्रामपंचायत – आशा टेकाम सरपंच व सदस्य, मुरमाडी ग्रामपंचायत – मंदा टेम्भरे सरपंच व सदस्य, मंगेझरी ग्रामपंचायत – छाया टेकाम सरपंच व सदस्य, सरांडी ग्रामपंचायत – निता दमाहे सरपंच व सदस्य, बघोली ग्रामपंचायत – गिरीश तूरकर सरपंच व सदस्य, भिवापूर ग्रामपंचायत – राजकुमार ठाकरे सरपंच व सदस्य, मांडवी ग्रामपंचायत – तुरेंद्र नागपुरे सरपंच व सदस्य, अत्री ग्रामपंचायत – संतोष साखरे सरपंच व सदस्य, भोबोळी ग्रामपंचायत – महेश लिल्हारे सरपंच व सदस्य, कोंडेलोहारा ग्रामपंचायत – रवींद्र भगत सरपंच व सदस्य, कोयलारी ग्रामपंचायत – रंजित वालदे सरपंच व सदस्य, मलपुरी ग्रामपंचायत – रिया ठाकूर सरपंच व सदस्य, करर्टी खुर्द ग्रामपंचायत – पंजाबराव उरकुडे सरपंच व सदस्य, डोंगरगाव ग्रामपंचायत – शिशुपाल पटले सरपंच व सदस्य, मुंडीकोटा ग्रामपंचायत – प्रतिमा जैतवार सरपंच व सदस्य, बिरसी ग्रामपंचायत – श्यामा शरणागत सरपंच व सदस्य, विहीरगाव ग्रामपंचायत – धनेश्वरी ठाकरे सरपंच व सदस्य, मारेगाव ग्रामपंचायत – सुनीता ठाकरे सरपंच व सदस्य, खैरलांजी ग्रामपंचायत – सचिन कढवं सरपंच व सदस्य, चोरखमारा ग्रामपंचायत – कल्पना दहीकर सरपंच व सदस्य, बोरगांव ग्रामपंचायत – ज्योती देशमुख सरपंच व सदस्य, घाटकुरोडा ग्रामपंचायत – प्रभा राऊत सरपंच व सदस्य, बिरोली ग्रामपंचायत – उषा मोहोरे सरपंच व सदस्य, बैयवाडा ग्रामपंचायत – उज्ज्वला उके सरपंच व सदस्य, गांगला ग्रामपंचायत – संजय बुद्धे सरपंच व सदस्य, सोनेखारी ग्रामपंचायत – दिव्या पटले सरपंच व सदस्य, मनोरा ग्रामपंचायत – ललिता मारवाडे सरपंच व सदस्य, करर्टी बु. ग्रामपंचायत – महेश पटले सरपंच व सदस्य, निमगाव ग्रामपंचायत – मनोज राउत सरपंच व सदस्य यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वश्री जगदिश कटरे, विजय बंसोड, विजय बुराडे, प्रशांत डाहाटे, किरण बंसोड, रामसागर धावडे, मुकेश बरियकर, श्यामराव भोंडेकर,नागेश तरारे, कोटीराम निशाणे, जितेंद्र चौधरी, विजय बिंझाडे, राजेश तुरकर, डॉ अनिल पारधी, थानसिंग हरिणखेडे, बब्लू ठाकुर, मनोहर राऊत, अल्केश मिश्रा, चंदा शर्मा, सौ.सीमा कटरे, अजय बारापात्रे, बळीराम धुर्वे, यशवंत पटले, भोजलाल नागपुरे, नथुजी बावनकर, अमरकंठ सार्वे, तेजराम टेम्भरे, बबलू पटले, इश्वर कटरे, बब्लू पटले, भूपेंद्र पटले, बबन कुकडे, राजेन्द्र पटले, राजेश श्रीरामे, विशेष छुगानी, रौनक ठाकूर सहित पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात श्री ईश्वर रहांगडाले यांच्या सह तिरोडा तालुक्यातील असंख्ये कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले