33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता बाघनदी पात्रातून वाळूची चोरी, आरोपीसंह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

बाघनदी पात्रातून वाळूची चोरी, आरोपीसंह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

0
31

blank

आमगाव(तुलसीदास भुजाडे),दि.29ः-गोंदिया पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई बाघनदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरी करणाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर ट्रॉली सह, एक ब्रास रेती असा किंमती 15 लाख 4 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई 28 डिसेंबरला आमगाव पोलीस ठाणे हद्दीत मारबाद घाट येथे करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे सर्व प्रकारचे अवैध व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच , जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास निर्देश दिले होते.त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. आमगाव हद्दीतील मारबद घाट, बाघनदीच्या पात्रातून काही लोक अवैधरित्या विना परवाना वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करीत असल्याचे माहितीच्या आधारे पदमपुर येथे व मारबद घाट, बाघ नदीपात्र परिसरात छापा कारवाई केली असता  एक स्वराज कंपनीचा निळया लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 35/G-6888, ट्रॉली क्र.MH35/AR-3867 अंदाजे किंमती किं.5 लाख रू व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किं.4 हजार रुपये.एक स्वराज कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH- 35/G-7744, ट्रॉली क्र. MH-35/AG – 5180 अंदाजे किं.5 लाख रू व एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अंदा. किं.5 लाख रूपये किमतीचा घटनास्थळावुन जप्त करण्यात आले.या प्रकरणात चालक विनेश प्यारेलाल ब्रम्हईया वय 26 वर्ष रा. गणेशपुर ता. आमगाव जि. गोंदिया,सतिश कुंजीलाल बागडे, वय 35 वर्षे रा. पदमपुर, ता. आमगाव, जि. गोंदिया,शुभम ज्ञानेश्वर बागडे वय 25 वर्षे रा. पदमपुर, ता. आमगाव यांच्या ताब्यातील तिन ट्रॅक्टर, किंमती 15 लाख रू व एक ब्रास वाळू किमती 4000/- रू. असा एकूण किंमती 15 लाख 4 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी ट्रॅक्टर चालक आरोपी क्र.1 ते 3 यांचेविरुद्ध पो. स्टे.आमगाव येथे कलम 379, 34 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून आमगाव पोलीस यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.

सदर ची कारवाई वरिष्ठांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात विशेष पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा.पो.शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

blank