
गडचिरोली :– भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांनी हत्या केली. घिसू मट्टामी (वय ५०) असे गावपाटलांचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली.घरी झोपेत असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी घिसू मट्टामी यास उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याची दोन गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.





