
नाशिक – जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ दूरवरून दिसत आहे. आगीच्या या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मी घटनास्थळी जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Maharashtra CM meets those injured in Nashik factory explosion
2 people have died, 17 injured in the incident. The expense of treating the injured will be borne by the govt. Ex-gratia of Rs 5 lakhs each will be given to families of the deceased. Inquiry to be conducted:CM Shinde pic.twitter.com/r5khozzD4z
— ANI (@ANI) January 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून, आतमध्ये अडकलेल्या लोकाचं बचावकार्य सुरु आहे. या घटनेत अकरा लोक जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सुयश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“कंपनीतील एका ठिकाणी अद्यापही तीन लोकं अडकले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच, आगीवर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
दादा भुसेंची प्रतिक्रीया
मंत्री दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना दर अर्ध्या तासाने आम्ही अपडेट देत आहोत. काही अंतरापर्यंत आपण गेलो परंतु खूप आत जाण्यावर बंधने घालण्यात आली आहे. कारण तेथे केमीकल टॅंक असल्याने स्फोट होण्याची शक्यता आहे. आग आटोक्यात आणणे व जखमींवर उपचार याला प्राधान्य दिले जात आहे.
आधी जीव वाचवू – भुसे
दादा भुसे म्हणाले, आग आटोक्यात आणण्यासाठी जेथून अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध होतील त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधी आग आटोक्यात आणण्याला प्राधान्य देऊ. त्यानंतर या घटनेची सविस्तर माहिती बघुया.
- आगीच्या घटनेबाबत रेस्क्यु ऑपरेशन केले जात आहे.
- एसपीसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत.
- चौदा लोक आतापर्यंत सुखरुप असून एका महिलेचा मृत्यू.
- जखमींशी प्रशासनाकडून विचारपुस
- फोम टेंडरद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे.
- ठाण्याकडूनही फायर टेंडर्सचा संपर्क सुरु आहे. नवीन वर्षामुळे आज प्लाॅंटमध्ये संख्या कमी होती.
- आग स्फोट झाल्याने लागली.
- लोकांचे जीव वाचावणे यालाच आधी महत्व
- रेस्क्यु मॅनेजमेंट प्लॅनची तयारी
- कंपनी परिसरात आजुबाजूला गवत असल्याने आग एकीकडून दुसऱ्या बाजूला जात आहे.
- आग आटोक्यात आणुन लोकांना बाहेर काढणे त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करणे यालाच प्राधान्य
- एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरु
Maharashtra | Massive fire breaks out in a factory located in Mundegaon village of Igatpuri tehsil in Nashik district
Details awaited. pic.twitter.com/jQhSHqZCX7
— ANI (@ANI) January 1, 2023
आकाशात धुराचे लोळ
स्फोटानंतर आकाशात धुराचे व आगीचे लोळ दूरवरूनही पाहायला मिळत होते. आगी एवढी जास्त होती की, धूर सर्वत्र पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,15 रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 11 जणांना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले अजून 2 जण अडकले असल्याची माहिती आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य करण्याचे प्रयत्न सुरू असून मी कायम जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
महत्त्वाचे
- सकाळी 9.30च्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली
- 20 ते 25 गावांत स्फोटाचे मोठे बसले हादरे
- हजारो कामगार कंपनीत काम करतात
- जिंदाल पॉलिफिल्म्स ही आशिया खंडातील पॉलिफिल्म्स बनवणारी मोठी कंपनी आहे.
- नाशिकच्या गोंदे गावातील ही घटना आहे.
- मुख्यमंत्री सिल्लोडची सभा रद्द करून तातडीने इगतपुरीकडे रवाना
आग विझविण्यासाठी मोठ्या अडचणी
आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.





