गोंदिया-क्रांतिवीर महात्मा फुले माळी समाज बहुउद्देशिय सामाजिक सस्था गोंदिया च्या माध्यमाने महिला कार्यकारिणीद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमचे आयोजन छोटा गोंदिया या ठिकाणी करण्यात आले. कार्यक्रमची सुरुवात मान्यवरच्या हस्ते दीपप्रज्योलित करून करण्यात आले. या कार्यक्रमचे उद्घाटक बंटीभाऊ बनेवार माजी सभापति नगरपरिषद गोंदिया तथा उपाध्यक्ष विदर्भ माळी महासंघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज बनकर -अध्यक्ष क्रांतिवीर महात्मा फुले माळी स. बहु. सा. संस्था गोंदिया, प्रमुख पाहुने म्हणून विष्णू नागरीकर माजी सभापती नगरपरिषद गोंदिया, सुनंदा बिसेन व्यवस्थापक न. प. गोंदिया यांची उपस्थित होती. या कार्यक्रमात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते शाळकरी मुलींसाठी निबंध स्पर्धा, महिलासाठी संगीत खुश्री स्पर्धा, उकाने, बटाटे दौड. सुई धागा दौड. तसेच मनोरंजनात्मक स्पर्धा मध्ये टिकली लावने, आणि बचत गटाच्या महिलासाठी पेन खेळ अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सायंकाळी परितोषिक वितरण व मार्गदर्सन कार्यक्रम विशेष अतिथी माजी आमदार गोपाल अग्रवाल , गोंदिया, विजय गराड सहायक पोलिस निरीक्षक गोंदिया, प्रमुख पाहुने विद्या बनेवार माजी सभापती न. प. गोंदिया, विना आरेकर अध्यक्ष सावित्रीबाई फुले विचार मंच गोंदिया, संध्या डोंगरवार, कोषाध्यक्ष ,सावित्रीबाई फुले विचार मंच गोंदिया, राजेंद्र देशकर उपाध्यक्ष, योगेश आमकर सचिव, योगेश बनकर सहसचिव, महेश नागरिकर कोषाध्यक्ष, सदस्य देवाजी नागरिकर, दिनदयाळ बानेवार यांच्या हस्ते विजेत्याना पारितोषिक वितरण करण्यात आले. यशस्वितेकरिता अध्यक्ष सुषमा आमकर, उपाध्यक्ष मंजूलता बनकर, वंदना बनकर, महासचिव रीना बनकर, शोभा बनकर, सचिव मीनाक्षी शहारे, योगीता भुते, सहसचिव माहेश्वरी नंदरधने, अरूणा नागरीकर कोषाध्यक्ष, कल्पना नागरीकर माधुरी मदनकर यांनी सहकार्य केले.