
चंद्रपूर- ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत मराठी बाणा चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या इरफान मुजावर लिखित आशिष अम्बाडे निर्मित वृंदावन या नाटकाने प्रथम पुरस्कारावर मोहोर उमटवत सात पारितोषिके पटकाविली आहेत. वृंदावन या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
वृंदावन या नाटकाला सांघिक प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषीक बकुळ धवने हिला जाहीर झाले आहे. हेमंत गुहे यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रथम पारितोषीक मेघना शिंगरू यांना जाहीर झाले आहे.
उत्कृष्ट अभियानासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रोहिणी उईके, बकुळ धवने आणि तुषार चहारे यांना जाहीर झाली आहेत. एकूण सात पारितोषिके पटकावत वृंदावनने राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
या नाटकाचे नेपथ्य तेजराज चिकटवार, पंकज नवघरे, अंकुश राजुरकर यांचे आहे. नाटकाचे संगीत नियोजन लिलेश बरदाळकर यांचे आहे.
या नाटकात नूतन धवने, रोहिणी उईके, बबिता उईके, बकुळ धवने, पंकज मलिक, तुषार चहारे, मानसी उईके, अश्विनी खोब्रागडे, कृष्णा सुरमवार, कृतीका डोंगरे, वर्षां कोंडेकर, माधुरी गजपुरे, आशा बॅनर्जी, हर्षरिका बॅनर्जी, स्नेहल कावळे, रोशन बघेल, वैशाख रामटेके, सूरज उमाटे, अंकुश राजुरकर, प्रज्ज्वल निखार, स्वनिल चहारे, यशोधन गडकरी यांच्या भूमिका आहेत. वृंदावनच्या यशस्वी चमूचे येथील सांस्कृतिक वतरुळात अभिनंदन करण्यात येत आहे.