
खेमेंद्र कटरे/ गोंदिया,दि.18ः- येथील शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सिव्हीललाईनस्थित बोळीजवळील नगरपरिषदेच्या जागेत असलेल्या मत्यव्यवसाय विभागाच्या बंद पडलेल्या जुन्या शासकीय चारचाकी वाहनाला जेसीबीच्या माध्यमातून उचलून नेऊन कारंजा परिसरात असलेल्या अनिल नामक कबाडीच्या दुकानात कापले गेले.गोंदिया शहर पोलिसांनी अनिल कबाडीच्या दुकानातून त्या वाहनाला कापले जात असताना रंगेहात पकडून साहित्य हस्तगत केले या घटनेला आता एक महिना लोटत चालला आहे.मात्र त्या अनिल कबाडीला अद्यापही पोलीस अटक का करु शकली नाही,असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे चर्चेनुसार गोंदिया शहरातील एक नामाकिंत व्यक्ती या प्रकरणात अनिल कबाडीला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असून पोलीसही त्या व्यक्तीच्या दबावात असल्याची चर्चा आहे.
एकीकडे रात्रदिंवस पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात अनेक चोरट्यांना ताब्यात घेत अटक केली जात आहे.रात्रीला गस्त घालून वाळूमाफियांची नसबंदी केली जात आहे.अशात शासकीय वाहन कबाडीत कापणारा भंगारवाला मात्र एक महिन्यापासून मोकाट कसा अशा प्रश्न साहजिकच कुणीही उपस्थित करु शकतो.या एका शासकीय वाहनाच्या माध्यमातून त्या भंगारवाल्याने आत्तापर्यंत किती शासकीय वाहने अवैधरित्या कापले याचा तपास पोलीसी खाक्या दाखवून व्हायला हवा होता.मात्र हे वाहन चोरीचे प्रकरणच एकप्रकारी व्हीआयपी प्रकरण असल्याने पोलीसही सदर प्रकरणाच्या खोलवर जाण्याएैवजी आज नाही उद्याच्या तारखेत टाळाटाळ करुन अवैधरित्या असा प्रकार करणार्या भंगारवाल्यास पाठबळ तर देत नाही ना?एकीकडे याप्रकरणात भाड्याने गेलेल्या जेसीबीमालकाच्या व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली जाऊ शकते तर ज्या अनिल कबाडीच्या दुकानात हे वाहन कापले जात असताना गोंदिया शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने साहित्य हस्तगत केले,तो कबाडीवाला कसा काय आजपर्यंत खुलेआम फिरतोय.विशेष म्हणजे त्या वाहनाला विकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला गोंदिया शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.मात्र ज्या भंगारवाल्याकडे हे शासकीय वाहन कापले जात होते,त्या भंगारवाल्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आले,मात्र त्या भंगारवाल्याला अटक तर केलीच नाही.पण प्रसिध्दीपत्रकात त्याचे नावही टाकायला का विसरले अशा चर्चांना उधाण आले आहे.जेव्हा विचारणा केली असता अनिल कबाडीच्या दुकानात वाहन कापले जात असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय वाहन उचलून नेत ते विकण्याचा प्रताप करणार्या टोळीमूळे शहरात अनेक ठिकाणी शासकीय वाहने भंगारवस्थेत पडून असल्याने त्यांची विल्हेवाट तर अशाप्रकारे कबाडींच्या माध्यमातून लावली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांना काही विशेष कबाडीव्यवसायिकांच्या सखोल चौकशीची गरज झाली आहे.
प्रकरण असे की, शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालय सहा. आयुक्त मत्स व्यवसाय, (तांत्रीक) गोंदिया, यांचे कार्यालयीन उपयोगा करीता सन 1995 पासुन वापरात असलेली व सन 2012 पासुन नादुरुस्त असलेली महीन्द्रा कंपनीची कमांडर जिप, वाहन क्रं. MH.35 / A 9968 ही कार्यालयाचे जुने ठिकाण बोहरा यांचे घरी, इंगळे चौक गोंदिया येथील कार्यालयाचे मागील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत उभी करून ठेवलेली होती.मात्र कुणीतरी अज्ञात चोरांनी ते वाहन चोरी केल्याचे सौ.चित्रांगणा केवळराम सलामे (रा. डोंगरगाव, सडक/अर्जुनी) यांच्या तक्रारीवरून 09/12/2022 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 780/2022 कलम 379 भादंवि अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या प्रकरणात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारानी चित्रीकरणाच्या आधारे गुन्ह्यांतील चोरीस गेली गाडी ही चित्रीकरणामध्ये गुरमितसिंग भाटीया क्रेनच्या साह्यानं ACE कंपनीची कमांडर हॉयड्रा (क्रेन) 14 XM सेंद्री रंगाचा वाहन क्रं. MH.35/AR 1827 ज्यावर गुरमीतसिंग भाटीया क्रं. 4 असे लिहीलेले किं. अं.12,00000/- रुपये क्रेन मालक यांचे कार्यालयात काम करणारे मॅनेजर नामे रमेश यशंवतराव गौतम वय 51 वर्षे, रा. गजानन कॉलोनी शास्त्री यांचे कडून हस्तगत केली.तसेच या गुन्हयात अमित रामचंद्र धनखड, वय 37 वर्षे, रा. सिव्हील लाईन, माता मंदीर चौक, बोडी जवळ गोंदिया यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये जावेद शेख,रा.सिव्हील लाईन,गोंविंदपुर गोंदिया व संजु नायर,रा. सिव्हील लाईन गोंदिया यांचा सहभाग असल्याचे निष्पण झाल्याने या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडे विचारपूस करून तपास केला असता त्यांनी चोरीस गेलेली जीप ही भंगारमध्ये असल्याचे सांगितल्याने भंगारवाल्याकडे असल्याचे सांगण्यात आले.जेव्हा पोलिसांचे पथक हे भंगारवाल्याकडे पोचले असता त्या चारचाकी जिपचे इंजिन गेअर बॉक्ससह,चार डिक्स टायरसह,मागचा गुल्ला ,समोरचा गुल्ला तीन तुकडे,दोन कमानी,एक सापट,सायलेंसरचे ३ तुकडे व प्लॉस्टिक डॅश बोर्ड असे सुटे भाग मिळुन आल्याने हस्तगत करण्यात आले होते.याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पाटील यांना विचारणा केल्यावर मात्र त्यांनी लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.





