24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनुकंपाधारकांची भरती घ्या- आ.विजय रहांगडाले यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनुकंपाधारकांची भरती घ्या- आ.विजय रहांगडाले यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

0
32

तिरोडा:- अनुकंपा भरती शासन निर्णनयानुसार २० % व माहे जानेवारी ते माहे फेब्रुवारीच्या आत व्हावी म्हणुन आमदार  विजय रहांगडाले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. ७५ व्या स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सरळ सेवा भरतीच्या अनुसंघाने ७५ हजार जागा भरण्याचा निर्णय शासनाने केला आहे. तरी त्यात सरळ सेवा कोट्यातील प्रति वर्ष रिक्त होणा-या पदाच्या २० टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरावयाची संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आली असून त्यावर अधिक भर देवून अनुकंपा धारकांना लवकरात लवकर त्यांचा हक्क मिळवून द्यावा कारण शासकीय सेवेत असताना कर्मचा-यांचे निधन झाल्यास त्यांचा कुटुंबावर ओढवणा-या आर्थिक आपत्‍ती तून कुटुंबास बाहेर काढण्याकरिता आणि आपत्‍ती जणक परिस्थिती वर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधीत मृत कर्मचा-याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा ( सहानुभुती ) म्हणुन अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात यावी. अनुकंपा नियुक्तीचे सदर प्रयोजन विचार घेता अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती द्यावी तथापी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज केल्यानंतर नियुक्ती मिळण्यास काही वर्षा कालावधी लागत असतो. अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षा सूचित प्रलंबित उमेद्वारांची संख्या व त्यांची वयोमर्यादा दिवसेंदिवस वाढत आहे कोविड १९ च्या पार्श्र्वभुमी वर अनुकंपा नियुक्ती धोरणा नुसार तातडीने रोजगार उपलब्ध करुन दिल्यास या योजनेच उद्देश साध्य होईल ही बाब विचारात घेवून अनुकंपा नियुक्तीच्या कार्य पध्दती बाबद असणारा संभ्रम दूर करुन अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया जलद गतिने पुर्ण करावी. तसेच २०२१ ची भरति प्रक्रिया संपुष्टात आली असून नवीन यादी प्रकाशित करून २०२२ च्या भरति प्रक्रियेला सुरुवात करावी कारण गोंदिया जिल्हा परिषदेला जवळपास १८० च्या वर अनुकंपा धारक नियुक्तीची वाट बघत असून त्यांना लवकरात लवकर योग्य ती प्रक्रिया पार पाडून नियुक्ती देण्यात यावी खरे पाहता बहुतांश जिल्ह्यात अनुकंपा भरती व नवीन यादी प्रकाशीत झाली असून गोंदिया जिल्हाची भरती प्रक्रिया मागे का असे अनेक प्रकारचे विचार अनुकंपा धारकांच्या मनावर येत असतात घरी शासकीय सेवेत असताना कर्मचा-याचे निधन झाल्यास दैनंदिन जिवनाला कसे समोर जावे लहान मुल, बाळ असले की त्यांच्या संगोपण कोणत्या माध्यमातून करावा असे अनेक विचार अनुकंपा धारकांच्या मनी पडत असतात २००५ च्या नंतर ज्या कर्मचा-यांची नियुक्ती झाली अश्या कर्मचा-यांच्या निधना नंतर पेन्शन सुध्दा लागु झाली नाही. अश्या सुध्दा परिवाराला अनुकंपा सारखी गरज भासते परंतु भरती प्रक्रिया अतिशय उशिर होत असल्या मुळे जिवनशैली वर अडचण पडत असते म्हणुन अनुकंपा भरती ही तातडीने व्हावी म्हणुन दोनशे तिनशे परिवाराकडे लक्ष देवुन गोंदिया जिल्हा परिषदेची अनुकंपा पदभरती लवकरात लवकर व्हावी म्हणुन निवेदन देण्यात आले.यावेळी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, अनुकंपा संघर्ष समिती अध्यक्ष अतुलकुमार रामराव भरणे, उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद गोवरधन बघेले, श्रीकांत मेश्राम, सुजीत सुर्यवंशी, यश राऊत उपस्थित होते.