40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राष्ट्रीय देश वेगळ्या विदर्भासाठी आम आदमी पार्टीचा पाठिंबा

वेगळ्या विदर्भासाठी आम आदमी पार्टीचा पाठिंबा

0
33
नवी दिल्ली, दि. ३१ – श्रीहरी अणे यांनी आज वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली सचिवालयात ही बैठक पार पडली. वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून आपचे खासदार वेगळ्या विदर्भासंदर्भात संसदेत आवाज उठवणार आहेत’ अशी माहिती अणे यांनी बैठकीनंतर दिली आहे. ‘केजरीवाल यांचा आंदोलनला पाठींबा असून विदर्भाचा आवाज वाढतोय तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय’, असा आरोप अणे यांनी यावेळी केला
विदर्भाचा आवाज वाढतोय, तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपनं आमचा विश्वासघात केला. भाजपला बहुमत मिळालं परंतू आश्वासन पूर्ण केली नाहीत. असा आरोप श्रीहरी अणे यांनी भाजपावर केला आहे.