कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी करा

0
43
**कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  उप मुख्य लेखा व  वित्त अधिकारी चर्जे यांना मागण्यांचे निवेदन
गोंदिया, दि.6 : मागासवर्गीय शिक्षकांच्या  प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. ३ एप्रिलला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात आनंदकुमार चर्जे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन चर्जे यांनी दिले.
         कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करण्यात यावे, सेवानिववृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचारी/शिक्षक यांचे सेवानिवृत्त प्रकरणे मंजूर करण्यात यावे. कर्मचाऱ्यांना जी.पी.एफ. पावती दरवर्षी देण्यात यावी, शिक्षकांचे एन.पी.एस.खाते ऑनलाईन करण्यात यावे, जी.पी. एफ. शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा  तिसरा हफ्ता जमा करण्यात यावा व डीसीपीएस/एन.पी.एस धारकांना रोखीने देण्यात यावा, एन.पी.एस. खाते उघडलेल्या शिक्षकांच्या खात्यावर मागील डी.सी.पी.एस कपात राशी वर्ग करण्यात यावी, एन.पी.एस. कपातीची राशी त्याच महिन्यात एन.पी.एस. खात्यावर जमा करण्यात यावी,   सेवानिवृत्त प्राथ/माध्य/उच्च माध्यमिक शिक्षकांचे पेन्शन विक्री अंशराशिकरण, रजा रोखीकरण , उपदान, गटविमा, सर्व लाभ  देण्यात यावे, प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अविलंब मंजुर करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.
    शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, विरेंद्र भोवते, रोशन गजभिये, दीक्षांत धारगावे, राजेश गजभिये, उत्क्रांत उके, प्रमोद बघेले, अमित गडपायले, अजय शहारे व अन्य पदाधिकारी तसेच देशमुख, हुमने लिपिक उपस्थित होते.